पनवेलमध्ये पावणेतीनशे मोबाइल टॉयलेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 02:24 IST2017-07-29T02:24:08+5:302017-07-29T02:24:10+5:30

पनवेल महापालिकेची हागणदारीमुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. सार्वजनिक आणि वैयक्तिक शौचालय बांधण्याचे काम जोरात सुरू

panavaelamadhayae-paavanaetainasae-maobaaila-taoyalaeta | पनवेलमध्ये पावणेतीनशे मोबाइल टॉयलेट

पनवेलमध्ये पावणेतीनशे मोबाइल टॉयलेट

कळंबोली : पनवेल महापालिकेची हागणदारीमुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. सार्वजनिक आणि वैयक्तिक शौचालय बांधण्याचे काम जोरात सुरू आहेच, त्याचबरोबर चाळ, झोपडपट्ट्या तसेच ट्रक पार्किंगच्या ठिकाणी २८० मोबाइल टॉयलेट बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याशिवाय स्वच्छता अभियानांतर्गत जनजागृती करण्यात येत असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात येत आहे.
पनवेल शहरात वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी आतापर्यंत १८०८ जणांना अनुदान दिले. केंद्र सरकार ४०००, राज्य सरकार ८००० आणि उर्वरित ८००० रुपये महापालिकेकडून देण्यात आले. महापालिका हद्दीत १० सीटची २४ सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली आहेत. नादुरु स्त शौचालये दुरुस्त करण्यात आली आहेत. याशिवाय, पालिकेला २५० मोबाइल टॉयलेट सामाजिक संस्थांकडून देण्यात आली आहेत. ही शौचालये झोपडपट्टी, बैठ्या चाळी असलेल्या ठिकाणी उभारण्यात आली आहेत.
कळंबोली रोडपाली येथे मोकळ्या भूखंडावर अवजड वाहने उभी केले जातात. या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहाची सोय नसल्याने चालक क्लीनअर उघड्यावरच प्रात:विधीकरिता बसतात. त्यांच्यासाठीसुद्धा अशाप्रकारे शौचालयांची व्यवस्था करून देण्यात आली आहे. याशिवाय नावडे उड्डाणपूल, एमआयडीसीत मोबाइल टॉयलेट बसविण्यात आले आहेत. कळंबोली वसाहतीत पावसाळी नाल्याच्या बाजूला झोपड्या आहेत, तिथेही महापालिकेने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. दोन झोनमध्ये १३० मोबाइल टॉयलेट बसविण्यात आले आहेत. उर्वरित चार झोनमध्ये हे काम सुरू असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.

Web Title: panavaelamadhayae-paavanaetainasae-maobaaila-taoyalaeta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.