पनवेल शहरात एकाच दिवशी चार घरफोड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 01:04 IST2017-07-31T01:04:04+5:302017-07-31T01:04:04+5:30
पनवेल परिसरात शनिवारी एकाच दिवशी चार वेगवेगळ्या घरफोड्यांत लाखो रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे.

पनवेल शहरात एकाच दिवशी चार घरफोड्या
पनवेल : पनवेल परिसरात शनिवारी एकाच दिवशी चार वेगवेगळ्या घरफोड्यांत लाखो रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे.
करंजाडे येथील विजय आंग्रे यांच्या दूध डेअरीच्या छताचा पत्रा उखडून चोरट्यांनी आतील रोख रक्कम लंपास केली. शहरातील शिवाजी रोड येथील आशिष सहा यांच्या शूज दुकानाचे शटर उखडून चोरट्यांनी रोख रक्कम लंपास केली आहे. टिळक रोडवरील कनक हरी इमारतीमध्ये असलेल्या स्टेशनरी दुकानाचे शटर तोडून चोरी केली आहे. तशाच प्रकारे एका मेडिकल दुकानाचेसुद्धा शटर तोडून चोरट्यांनी रोख रक्कम लंपास केली आहे. याबाबतच्या तक्र ारी पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आल्या आहेत. चारही घटनेत चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. चारही घटनेत चोरट्यांनी दुकानाना टार्गेट केले आहे. यासंदर्भात पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे यांच्याशी संपर्क साधला असता, दोन आरोपींना अटक केली असून अधिक तपास सुरू असल्याचे सांगितले. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसल्याने पोलिसांना तपासात अडचणी निर्माण होत आहेत.