शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

कर्जतमधील पाली-भूतिवली धरण ओव्हरफ्लो

By admin | Updated: July 3, 2017 06:38 IST

तालुक्यातील रेल्वेपट्टा भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी पाटबंधारे विभागाने बांधलेला पाली-भूतिवली

लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : तालुक्यातील रेल्वेपट्टा भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी पाटबंधारे विभागाने बांधलेला पाली-भूतिवली लघुपाटबंधारे प्रकल्प पूर्ण भरून गेला आहे. धरणाचे कालवे पूर्ण नसल्याने धरणाचे पाणी शेतीसाठी सोडले जात नाही. त्यामुळे हे धरण जुलै महिन्याच्या पहिल्या तारखेला भरून वाहू लागले. सहलीसाठी प्रसिद्ध असलेल्या कर्जत तालुक्यातील या धरणावर मात्र पर्यटकांना पूर्णत: बंदी आहे.नेरळ-कर्जत रस्त्याच्या भिवपुरी रोड गावाच्या समोर पाली भूतिवली धरण असून, २००३मध्ये या धरणाचा मुख्य बांध घातला गेल्यानंतर पावसाळ्यात जलाशयात पाण्याचा साठा झाला होता. त्या वेळी आणि आजपर्यंत धरणाचे पाणी परिसरात असलेल्या ११०० हेक्टर शेतीला सोडण्यासाठी कालवे पाटबंधारे विभागाकडून खोदण्यात आले नाहीत. त्यामुळे धरणाचे पाणी आजतागत शेतीसाठी देण्यात आले नाही. परिणामी, ते पाणी आजही तसेच पडून असते. धरणातील साठून असलेले पाणी मोठ्या प्रमाणात तसेच राहत असल्याने ३५ दशलक्षघन मीटर क्षमता असलेल्या धरणात मोठ्या प्रमाणात पाणी शिल्लक राहते. त्यामुळे या वर्षी पावसाचा जोर चांगला असल्याने अवघ्या दहा दिवसांत धरणाच्या जलाशयाने आपली पातळी गाठली आणि राज्यात कृषी दिन साजरा होत असताना रविवारी सकाळी धरण ओव्हरफ्लो झाले. तो अनुभव धरणाच्या खाली असलेल्या आसल, भूतिवली या गावांतील शेतकरी आणि ग्रामस्थांनी अनुभवला.धरणाच्या सांडव्यातून वाहून जाणारे पाणी पाहण्यासाठी असंख्य लोक जमले होते. त्या वेळी उपस्थित असलेले आरपीआय आठवले गटाचे तालुका उपाध्यक्ष किशोर गायकवाड यांनी आपण पहिल्यांदाच असा धरण भरून वाहताना अनुभव घेतला. त्या वेळी फेसाळते पाणी पाहून त्यात भिजण्याचा अनेकांना उत्साह दिसून आला; पण त्या सर्वांना ग्रामस्थांनी अडविले. कारण, ज्या सांडव्यातून पाणी रविवारी सकाळी खाली कोसळले त्या सांडव्याचे काम पूर्ण झाले नाही. परिणामी, त्या सांडव्याखाली असलेल्या पायऱ्यांवर बसून अनुभवण्यासाठी पर्यटकांना सध्यातरी बंदी आहे. कारण ते काम अपूर्ण असल्याने त्या ठिकाणी पर्यटक आणि वर्षासहलप्रेमींना बंदी आहे. धरणाच्या जलाशयात आजपर्यंत बाहेरून फिरण्यासाठी आलेल्या किमान १० जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे धरणाच्या परिसरात पर्यटकांना बंदी घातली आहे. पाटबंधारे विभागाने आणि नेरळ पोलीस दलाने या ठिकाणी पर्यटनासाठी जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे.पाली-भूतिवली धरणात यापूर्वी अनेक पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. ते लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने अशा प्रकारच्या धबधब्यावर जाण्यास बंदी घातली होती. आम्ही पर्यटकांच्या जीविताला असलेला धोका लक्षात घेऊन पाली-भूतिवली धरणाच्या परिसरात जाण्यास बंदी घातली आहे. - विजय जाधव, सहायक पोलीस निरीक्षक, नेरळ पोलीस ठाणे