एनएमएमटीमुळे प्रवासी समाधानी

By Admin | Updated: October 10, 2015 00:42 IST2015-10-10T00:42:18+5:302015-10-10T00:42:18+5:30

नवी मुंबई परिवहन सेवेच्या सहकार्याने पनवेल शहरात एनएमएमटी बससेवा सुरू झाली आहे. या बससेवेला पनवेलचे नागरिक भरघोस प्रतिसाद देतील आणि त्यांच्याच

Overseas Satisfaction with NMTT | एनएमएमटीमुळे प्रवासी समाधानी

एनएमएमटीमुळे प्रवासी समाधानी

पनवेल : नवी मुंबई परिवहन सेवेच्या सहकार्याने पनवेल शहरात एनएमएमटी बससेवा सुरू झाली आहे. या बससेवेला पनवेलचे नागरिक भरघोस प्रतिसाद देतील आणि त्यांच्याच योगदानातून ही बससेवा यशस्वी ठरेल, असा विश्वास पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला.
नवी मुंबई महानगरपालिका, पनवेल नगर परिषद व सिटीझन्स युनिटी फोरम (कफ) यांच्या संयुक्त प्रयत्नातून सुरू करण्यात आलेल्या एनएमएमटी बससेवेचे शुक्र वारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सकाळी ९.३० वाजता नगर परिषद कार्यालयाजवळ उद्घाटन करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते.
७५ क्रमांकाची ही बस पनवेल रेल्वे स्थानक ते साईनगर या मार्गावर धावणार आहे. ४.७५ किलोमीटरच्या या मार्गावर एकवेळचे किमान भाडे ७ रु पये तर कमाल भाडे ११ रुपये असणार आहे.
कार्यक्र मासाठी नवी मुंबई स्थायी समितीच्या सभापती नेत्रा शिर्के, परिवहन सभापती साबू डॅनिअल, पनवेलच्या नगराध्यक्षा चारुशीला घरत, कफचे अध्यक्ष अरुण भिसे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Overseas Satisfaction with NMTT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.