शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देणे आमची कमिटमेंट; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 07:40 IST

मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसवून टिकणारे आरक्षण देणे ही आमची कमिटमेंट

नवी मुंबई : मराठा समाजाने राज्यातील विविध समाजांचे नेतृत्व केले आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांचे अठरापगडजातीचे मावळे एकमेकांसमोर उभे राहणे महाराष्ट्राला भूषणावह नाही. दोन समाजांमध्ये दुफळी निर्माण होणार नाही, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसवून टिकणारे आरक्षण देणे ही आमची कमिटमेंट असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी नवी मुंबईत दिले. 

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये  माथाडी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त  आयोजित  मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्याला आमदार गणेश नाईक, प्रवीण दरेकर, मंदा म्हात्रे, प्रसाद लाड, संदीप नाईक, संजीव नाईक उपस्थित होते. फडणवीस म्हणाले की, मराठा समाजाची चळवळ उभी करून अण्णासाहेब पाटील यांची आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची त्यांची मागणी तेव्हा दुर्दैवाने मंजूर होऊ शकली नाही. कायद्याच्या चौकटीत बसेल, अशी मागणी असली पाहिजे. अन्यथा एखादा निर्णय न्यायालयात टिकला नाही तर समाजाची फरपट होईल,  असेही फडण‌‌वीस म्हणाले. 

‘त्या’ कामगारांवर कारवाई करा

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये बांगलादेशी कामगार काम करत आहेत. कमी मजुरीत कामगार मिळतो म्हणून व्यापाऱ्यांनी त्यांना आश्रय देऊ नये. बांगलादेशी कामगारांवर कारवाई करावी, अशी मागणी माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी केली. 

बाजार समितीमधील आवक कमी झाली आहे. बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये बांगलादेशी कामगार काम करत आहेत. त्यांना मार्केटमध्ये आश्रय मिळत आहे. बांगलादेशमध्ये हिंदूंवर अन्याय होत आहे. येथे राहणाऱ्यांना काम दिले जात आहे. 

कमी पैशांत कामगार उपलब्ध होतात म्हणून त्यांना आश्रय देऊ नये. त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी पाटील यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केली. 

फडणवीस यांच्या भाषणातील मुद्दे : 

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून एक लाख उद्योजक घडवले, ८४०० कोटींचे कर्जवाटप.

मराठा समाजासातील हाॅस्टेल न मिळणाऱ्यांना ७ हजार निर्वाह भत्ता. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार