नवी मुंबईकरांसाठी खाद्यजत्रेचे आयोजन
By Admin | Updated: February 9, 2016 02:34 IST2016-02-09T02:34:20+5:302016-02-09T02:34:20+5:30
प्रत्येक प्रांताची स्वत:ची एक ओळख असते ती तिथल्या खाद्यसंस्कृतीमुळे. नवी मुंबई शहरात राहणाऱ्या विविध राज्यांतील नागरिकांमुळे मिनी भारत नावाने संबोधल्या जाणाऱ्या शहरात देशाच्या

नवी मुंबईकरांसाठी खाद्यजत्रेचे आयोजन
नवी मुंबई : प्रत्येक प्रांताची स्वत:ची एक ओळख असते ती तिथल्या खाद्यसंस्कृतीमुळे. नवी मुंबई शहरात राहणाऱ्या विविध राज्यांतील नागरिकांमुळे मिनी भारत नावाने संबोधल्या जाणाऱ्या शहरात देशाच्या कानाकोपऱ्यातील नागरिक एकत्रितपणे नांदताना दिसतात. वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थांचा आस्वाद एकाच ठिकाणी घेता यावा व नवी मुंबईच्या विविधतेचे एकात्म दर्शन घडावे याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ११ ते १४ फेब्रुवारी दरम्यान कालावधीत बेलापूर येथे महानगरपालिकेने बांधलेले किआॅस, सेक्टर ११, प्लॉट नं. ७१, ७२ आणि ७३ नवी मुंबई फूड फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे.
चार दिवस चालणाऱ्या या फूड फेस्टिव्हलच्या माध्यमातून आरोग्य तपासणी शिबिर, मोफत नेत्र तपासणी शिबिर, आहारतज्ज्ञांचे मार्गदर्शन अशाप्रकारचे उपक्र म राबविण्यात येत असून आरोग्य आणि शारीरिक क्षमता या विषयांबाबत जागरुकता निर्माण करण्यात येत आहे. फूड फेस्टिव्हलमध्ये ४० फूड स्टॉल, हस्तकला साहित्य-वस्तू, संगीत आणि नृत्याचे कार्यक्र म अशी विविध आकर्षणे असणार आहेत. याशिवाय फूड फोटोग्राफी व फूड वर्कशॉप या माध्यमातून कलावंतांना प्रोत्साहित केले जाणार आहे तसेच आरोग्यदायी स्वयंपाक आणि खाण्याच्या सवयी याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.
फेस्टिव्हलमध्ये खवय्यांना आकर्षित करतील अशा मालवणी, मुघलाई, क्वान्टिनेन्टल, बारबेक्यू, ग्रील्ड फूड, आॅरगॅनिक अशा वैविध्यपूर्ण पाककृती असणार आहेत. नवी मुंबईकरांनी या फूड फेस्टिव्हलला आवर्जून भेट देऊन नवी मुंबईच्या विविधतेतून एकता जपणा ऱ्या संस्कृतीचा खाद्यपदार्थांतून आस्वाद घ्यावा व मनोरंजन कार्यक्र मांसह काही क्षण कुटुंबीयांसमवेत एकत्र आनंदाने घालवावेत, असे आवाहन नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे आणि महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या वतीने करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)