बेलापूर किल्ला संवर्धनाचे काम थांबविण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 00:00 IST2020-10-09T23:59:20+5:302020-10-10T00:00:09+5:30

पुरातत्त्वीय निकषांचे उल्लंघन; संयुक्त पाहणी

Order to stop Belapur fort conservation work | बेलापूर किल्ला संवर्धनाचे काम थांबविण्याचे आदेश

बेलापूर किल्ला संवर्धनाचे काम थांबविण्याचे आदेश

नवी मुंबई : पुरातत्त्वीय निकषांचे उल्लंघन होत असल्यामुळे बेलापूर किल्ला संवर्धनाचे काम तत्काळ थांबविण्याचे आदेश राज्य पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाने दिले आहेत. सिडकोसोबत संयुक्त पाहणी करून पुढील निर्णय होईल.

सिडकोच्या वतीने बेलापूर किल्ला संवर्धनाचे काम सुरू आहे. नवी मुंबईमधील एकमेव ऐतिहासिक वारसास्थळाची दुरुस्ती पुरातत्त्वीच निकषांप्रमाणे व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केली. ऐतिहासिक बुरुजांच्या दुरुस्तीसाठी सिमेंटचा वापर करण्यासही आक्षेप घेतला होता. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे, तेजस शिंदे, नितीन चव्हाण, श्रीकांत माने, अमोल मापारी यांनी नुकतीच सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांची भेट घेऊन किल्ला संवर्धन कामातील त्रुटी निदर्शनास आणल्या होत्या. देशमुख यांनी तत्काळ पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांना काम थांबवून चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

पुरातत्त्व विभागाने ७ आॅक्टोबरला सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र दिले आहे. किल्ला सवंर्धनाचे काम पुरातत्त्वीय निकषाप्रमाणे होत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीची खातरजमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे सिडकोने तत्काळ संवर्धनाचे काम थांबवावे. स्मारकाची सद्यस्थिती जाणण्यासाठी एकत्रित स्थळ पाहणी करणे आवश्यक असून, त्यासाठी कागदपत्रांसह अधिकारी नियुक्त करावा. सदर अधिकाºयाबरोबर प्रत्यक्ष पाहणी करून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे स्पष्ट केले.

Web Title: Order to stop Belapur fort conservation work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.