ठाण्यासह निवडणूक क्षेत्रांत शस्त्रमनाई

By Admin | Updated: January 5, 2015 22:53 IST2015-01-05T22:53:05+5:302015-01-05T22:53:05+5:30

कल्याण-डोंबिवली महानगरपालिके च्या प्रभाग क्रमांक ९२ तसेच उल्हासनगर महानगरपालिका प्रभाग क्रमांक १३ (अ) येथे येत्या १८ जानेवारीला पोटनिवडणूक होणार आहे.

Opposition in Thane constituency | ठाण्यासह निवडणूक क्षेत्रांत शस्त्रमनाई

ठाण्यासह निवडणूक क्षेत्रांत शस्त्रमनाई

ठाणे : राज्य निवडणूक आयोगाने ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १३(अ), ३४-(अ) आणि (ब), ६१-(अ), ६३-(अ) व कल्याण-डोंबिवली महानगरपालिके च्या प्रभाग क्रमांक ९२ तसेच उल्हासनगर महानगरपालिका प्रभाग क्रमांक १३ (अ) येथे येत्या १८ जानेवारीला पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे या निवडणूक क्षेत्रात शस्त्रमनाई आदेश १९ जानेवारीपर्यंत जारी करण्यात आला आहे. या पोटनिवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता १२ डिसेंबर २०१४ पासून लागू झाली असून मतदान १८ जानेवारी २०१५ रोजी होणार आहे. त्याची मतमोजणी व निकाल १९ जानेवारी २०१५ रोजी होणार आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालयात यापूर्वी वेगवेगळ्या पक्षांमध्ये राजकीय स्पर्धेपोटी वादविवाद होऊन वेगवेगळ्या निवडणुकीच्या संबंधांत दखलपात्र व अदखलपात्र गुन्हे दाखल झाले आहेत. आगामी ठाणे, कल्याण-डोंबिवली व उल्हासनगर महानगरपालिका पोटनिवडणुकीच्या निमित्ताने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आपसात भांडणतंटे होऊन हातघाईवर येण्याची शक्यता आहे. याप्रसंगी एखाद्या गटाकडून / व्यक्तीकडून हत्याराचा दुरुपयोग होऊन गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून निवडणुकीच्या कार्यक्षेत्रातील शस्त्र परवानाधारक यांना शस्त्रांची ने-आण करण्याबाबतही प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. आयुक्तालयातील पोलीस उपायुक्त परिमंडळ-१, ठाणे अंतर्गत मुंब्रा पो.स्टे. परिमंडळ-५, वागळे इस्टेट अंतर्गत वर्तकनगर, वागळे इस्टेट, श्रीनगर पोलीस ठाण्यात, परिमंडळ-३, कल्याण अंतर्गत डोंबिवली पोलीस स्टेशन व परिमंडळ-४, उल्हासनगर अंतर्गत उल्हासनगर पोलीस हद्दीतील शस्त्र परवानाधारक यांना शस्त्र ताब्यात ठेवण्यास व बाळगण्यास मनाई करण्यात येत आहे. तथापि, छाननी समितीने ज्यांना सूट दिलेली आहे, त्या शस्त्र परवानाधारकांना हा मनाई आदेश लागू होणार नाही. ज्या परवानाधारकांना या आदेशान्वये छाननी समितीने सूट दिलेली आहे, त्या परवानाधारकांनी आपली शस्त्रे निवडणुकीच्या कोणत्याही कार्यक्रमादरम्यान वापरावयाची नाही. हा एकतर्फी आदेश जारी करण्यात आला आहे.

Web Title: Opposition in Thane constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.