शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

सहा विषय समितीच्या सभापतीपदी नवख्यांना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 2:05 AM

पनवेल महापालिकेच्या सभापतीपदासाठी आठपैकी सहा सभापतीपदी नवख्या नगरसेवकांची वर्णी लागली आहे. त्यामुळे तरुण नगरसेवकांना या पनवेल महापालिकेत काम करण्याची संधी दिली गेली असल्याचे बोलले जात आहे.

मयूर तांबडेपनवेल : पनवेल महापालिकेच्या सभापतीपदासाठी आठपैकी सहा सभापतीपदी नवख्या नगरसेवकांची वर्णी लागली आहे. त्यामुळे तरुण नगरसेवकांना या पनवेल महापालिकेत काम करण्याची संधी दिली गेली असल्याचे बोलले जात आहे.पनवेल महापालिका स्थापन होण्याआधीपासूनच राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली होती. भाजपाने पनवेल महापालिका होण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते तर काही पक्षांचा पनवेल महापालिकेला विरोध होता. काहींनी पालिकेविरोधात न्यायालयात याचिका देखील दाखल केल्या होत्या. असे असले तरी १ आॅक्टोबर २०१६ रोजी पनवेल महानगरपालिका ही महाराष्ट्रातील २७वी व रायगड जिल्ह्यातील पहिली महापालिका म्हणून अस्तित्वात आली. महापालिका स्थापन झाल्यानंतर २६ मे २०१७ ला पालिकेच्या निवडणुका घेण्यात आल्या. यात भाजपाला घवघवीत यश मिळाले. शेकापला पराभव स्वीकारावा लागला. राष्ट्रवादी व काँग्रेसला प्रत्येकी २ नगरसेवकांवर समाधान मानावे लागले. मनसे व शिवसेनेला भोपळा देखील फोडता आला नाही. त्यामुळे महापौरपदी नवख्या कविता चौतमोल यांना संधी देण्यात आली, तर पालिकेचे सभागृह नेतेपद तरु ण उमेदवार परेश ठाकूर यांना देण्यात आले.गेल्या चार महिन्यांपासून पालिकेच्या विषय समितीच्या सभापतीची निवड होणे बाकी होते. यात भाजपाच्या आठ सभापतींची बिनविरोध निवड ४ आॅक्टोबर रोजी करण्यात आली आहे. आठपैकी सहा सभापती हे पहिल्यांदाच भाजपाच्या तिकिटावर निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांची पहिल्याच फेरीत सभापतीपदी वर्णी लागल्याने लॉटरी लागल्याचे बोलले जात आहे. प्रकाश बिनेदार हे तीन वेळा तर दर्शना भोईर दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. तर नीलेश बाविस्कर, विद्या गायकवाड, विकास घरत, अरु ण भगत, अमर पाटील, मनोज भुजबळ हे पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आले व त्यांना सभापतीपदाची लॉटरी लागली. मात्र, यामुळे भाजपाच्या काही नगरसेवकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. काही नगरसेवकांनी उघडउघड नाराजी व्यक्त केली होती.आठ विषय समित्याआठ विषय समिती पदासाठी आठ अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी मनोज भुजबळ, झोपडपट्टी पुनर्वसन आणि सामाजिक विकास सभापतीपदी प्रकाश बिनेदार, पाणीपुरवठा आणि मलनि:सारण समिती सभापतीपदी नीलेश बाविस्कर, महिला व बालकल्याण सभापतीपदी दर्शना भोईर, शिक्षण, क्र ीडा व सांस्कृतिक युवा कल्याण सभापतीपदी विद्या गायकवाड, सार्वजनिक उद्याने तलाव शहर सभापतीपदी विकास घरत, आरोग्य स्वच्छता वैद्यकीय रुग्णालय सेवा सभापतीपदी डॉ. अरुण भगत तर स्थायी समिती सभापतीपदी अमर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई