कोपरखैरणेमधील भुयारी मार्ग रहदारीसाठी खुला
By Admin | Updated: July 24, 2016 04:03 IST2016-07-24T04:03:28+5:302016-07-24T04:03:28+5:30
कोपरखैरणे रेल्वे स्टेशनजवळील भुयारी मार्गामध्ये गाळ साचला असल्याने हा मार्ग रहदारीसाठी बंद झाला होता. नागरिकांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर सिडकोचे

कोपरखैरणेमधील भुयारी मार्ग रहदारीसाठी खुला
नवी मुंबई : कोपरखैरणे रेल्वे स्टेशनजवळील भुयारी मार्गामध्ये गाळ साचला असल्याने हा मार्ग रहदारीसाठी बंद झाला होता. नागरिकांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर सिडकोचे कार्यक्षेत्र असतानाही पालिकेने गाळ काढून नागरिकांची गैरसोय दूर केली आहे.
सेक्टर १४ मधील निसर्ग उद्यानामध्ये वॉक वुईथ कमिशनर उपक्रमाच्या वेळी भुयारी मार्गाच्या समस्येकडे नागरिकांनी आयुक्तांचे लक्ष वेधले होते. भुयारी मार्गामध्ये गाळ साचला आहे. पावसामुळे चिखल तयार झाला असल्याने व मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने या मार्गाचा वापर बंद झाला होता. भुयारी मार्ग सिडकोच्या अखत्यारीत आहे.
देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारीही त्यांचीच आहे. परंतु संबंधित प्रशासन लक्ष देत नसल्याने आयुक्तांनी येथील गाळ काढण्याच्या सूचना अभियांत्रिकी विभागास दिल्या होत्या.
शहर अभियंता मोहन डगावकर यांनी तत्काळ येथील गाळ काढून साफसफाई केली आहे. तक्रार केल्यानंतर आठ दिवसांच्या आतमध्ये भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला केल्यामुळे नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे.
पालिकेकडे नागरिकांनी केलेल्या तक्रारींची तत्काळ दखल घेतली जात आहे. जी कामे, नियमामध्ये बसणारे प्रश्न आहेत ते तत्काळ सोडविण्यात येत आहेत. सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेवून काम करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
(प्रतिनिधी)