ऑनलाइन रंगला श्रावण सोहळा; डिजिटल नेत्रदीपक सोहळ्याला लाखांच्या वर पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 14:28 IST2020-08-09T23:56:14+5:302020-08-10T14:28:36+5:30

संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी साजरा झाला उत्सव

Online Rangala Shravan ceremony; Millions of digital spectacle celebrations | ऑनलाइन रंगला श्रावण सोहळा; डिजिटल नेत्रदीपक सोहळ्याला लाखांच्या वर पसंती

ऑनलाइन रंगला श्रावण सोहळा; डिजिटल नेत्रदीपक सोहळ्याला लाखांच्या वर पसंती

नवी मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी साजरा झाला उत्सव. ‘‘आला श्रावण आला श्रावण’’ असं म्हणत म्हणत श्रावण आलासुद्धा आणि बहुचर्चित बहुप्रतीक्षित बहुरंगी ‘लोकमत सखी मंच’चा श्रावण सोहळ्याचा पहिला कार्यक्रम प्रचंड प्रतिसादात पार पडला. या श्रावण सोहळ्याचे पॉवर्डबाय पार्टनर आहे स्टार प्रवाह आणि असोसिएट पार्टनर आहे जाई काजळ, डॉ. रिचा'ज युनिक क्लिनिक आणि संजय घोडावत ग्रुप स्टार उत्पादन.

भाडीपा ग्रुपच्या उपस्थितीने कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुयश टिळक आणि जुई गडकरी यांच्या उपस्थितीने हा सोहळा आणखी रंगतदार झाला. जुईनी खूप साऱ्या गप्पा मारल्या व टिम्ब टिम्बचे नाव घेत उखाणाही घेतला.

या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचा कुकरी शो. संजय घोडावत ग्रुप स्टार उत्पादन वापरून विष्णूजींनी मालपुवा, गुलपट्टी अशा लज्जतदार आणि चविष्ट पदार्थांची मेजवानी डिजिटल उपस्थितांना दिली व ‘ती’च्यासाठी उखाणा घेत, हास्याचे कारंजे फुलवत हा कुकरी शो सादर केला. यानंतर स्टार प्रवाह वहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील कार्तिक आणि दीपा यांची उपस्थिती भाव खाऊन गेली, एकमेकांसाठी उखाणा घेतला. या कार्यक्रमात ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील कलाकारांची उपस्थिती सखींसाठी सरप्राइज होती.

१७ ऑगस्टपासून स्टार प्रवाह वाहिनीवर रात्री ९.३० वाजता ही मालिका सुरू होत आहे. गप्पा, गाणी, विनोद, उखाणे असा हा डिजिटल श्रावण सोहळा उत्साहात संपन्न झाला.

हा कार्यक्रम आपणास लोकमतच्या यूट्युब चॅनलवर तसेच फेसबुकवर उपलब्ध आहे.

यूट्युब - https://www.youtube.com/watch?v=St4CXwToDMI

फेसबुक - https://www.facebook.com/watch/live/?v=583455015870547&ref=watch_permalink

स्टार प्रवाहने उखाणा स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत नवºयाने आपल्या बायकोप्रति प्रेम व्यक्त करणारा उखाण्याचा २०-४० सेकंदांचा व्हिडीओ आम्हाला 9326609872 या नंबरवर व्हॉट्सअ‍ॅप करा. बेस्ट उखाणे स्टार प्रवाहवर दाखविले जातील आणि बक्षिसेही मिळतील.
डॉ. रिचार्ज युनिक क्लिनिकतर्फे एक विशेष बेस्ट स्किनची सेल्फी स्पर्धा. आपला ओरिजिनल सेल्फी पाठवा या 9326609872 नंबरवर आणि जिंका बक्षिसे.
जाई काजळ लावून सेल्फी. घेताना जाई काजळच्या डबीसह घेतलात तर फारच छान. तुमचे फोटो आम्हाला 9326609872 या नंबरवर व्हॉट्सअ‍ॅप करा आणि जिंका आकर्षक बक्षिसे.
संजय घोडावत मिठाई मेळा स्पर्धा- ग्रुपच्या स्टार उत्पादनांपैकी कोणतेही उत्पादन वापरून गोड पदार्थ बनवा आणि स्टार उत्पादनासह फोटो काढला तर उत्तमच. आम्हाला 9326609872 या नंबरवर व्हॉट्सअ‍ॅप करा.

तसेच ११ ऑगस्ट रोजी असाच श्रावण सोहळा रंगणार आहे. आपले लाडके प्रसाद ओक आणि शिल्पा तुळसकर यांची विशेष उपस्थिती राहील. श्रावण शृंगार, भरपूर मनोरंजन आणि सरप्राईजनी भरलेला नक्की पाहा ३:३० वाजता. या धमाल कार्यक्रमात सहभागी व्हा!

Web Title: Online Rangala Shravan ceremony; Millions of digital spectacle celebrations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.