दुर्बल गटांच्या आरक्षित जागांसाठी आॅनलाइन प्रवेश
By Admin | Updated: March 2, 2015 23:07 IST2015-03-02T23:07:35+5:302015-03-02T23:07:35+5:30
प्रत्येक पालकाचा आपल्या पाल्याने नामांकित शाळांमध्ये शिकले पाहिजे, असा आग्रह असतो. मात्र, वंचित आणि दुर्बल गटांतील मुलांना तेथे प्रवेश मिळत नाही.

दुर्बल गटांच्या आरक्षित जागांसाठी आॅनलाइन प्रवेश
ठाणे : प्रत्येक पालकाचा आपल्या पाल्याने नामांकित शाळांमध्ये शिकले पाहिजे, असा आग्रह असतो. मात्र, वंचित आणि दुर्बल गटांतील मुलांना तेथे प्रवेश मिळत नाही. म्हणून ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने या गटांच्या राखीव २५ टक्क्यांसाठी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया जिल्ह्यातील महापालिका (अर्बन) भागात हाती घेतली आहे. जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.
जिल्हा विभाजनानंतर ठाणे जिल्ह्यात सहा तालुके असून येथील ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर आणि नवी मुंबई या सहा महापालिकांतील ४०१ खाजगी आणि विनाअनुदानित शाळा आहेत. त्यामध्ये वंचित आणि दुर्बल गटांतील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही, अशा तक्रारी प्राथमिक शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. यावरील उतारा म्हणून महापालिका हद्दीतील शाळांचे सर्वेक्षण करून २५ टक्के आरक्षित जागांसाठी आॅनलाइन प्रवेशची मात्रा राबवली जाणार आहे.
२८ फेब्रुवारी ते ११ मार्चपर्यंत प्रवेश अर्ज भरता येणार आहेत. ६६६.१३ी25ंे्रि२२्रङ्मल्ल.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरायचा आहे. यासाठी जातीचा, ४० पेक्षा जास्त अपंगत्वाचा, उत्पन्न, जन्मतारीख आणि रहिवासी पुरावा हे दाखले ग्राह्यमानले जातील. त्यामुळे एससी, एसटी आणि १ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश अर्ज भरण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेचा हा पहिलाच प्रयोग असून अर्बन भागात आॅनलाइन तर ग्रामीण भागात आॅफलाइन पद्धतीने प्रवेश घेता येणार आहेत. तसेच २५ टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज केल्यास तेथे १७ किंवा १८ मार्चला लकी ड्रॉ घेतला जाणार आहे.
- मीना यादव-शेंडकर, शिक्षणाधिकारी, ठाणे जिल्हा परिषद, प्राथमिक विभाग
४जिल्ह्यातील ग्रामीण भागात आॅफलाइनद्वारे प्रवेश दिला जाणार आहे.
४ही प्रक्रिया १ मार्चपासून सुरू होणार असली तरी २ ते ७ मार्चदरम्यान प्रवेश अर्ज घेऊन ते तेथे भरून द्यायचे आहेत. ही प्रक्रिया शाळांद्वारे राबवली जाणार आहे.
आॅनलाइनच प्रवेशपत्र मिळणार
४अर्ज भरताना मोबाइल नंबर देणे आवश्यक आहे. त्यावर मेसेज येणार असून तो आल्यावर पुन्हा संकेतस्थळावर जाऊन प्रवेशपत्र घ्यावयाचे आहे. त्यानंतर, शाळेत प्रवेश मिळणार आहे.
महापालिकाशाळा संख्या
ठाणे१३०
नवी मुंबई१०६
भिवंडी२६
कल्याण-डोंबिवली५१
उल्हासनगर१८
मीरा-भार्इंदर७०
एकूण४०१