शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

आखातातील युद्धामुळे कांद्याने रडवले; आवक दुप्पट, भाव कमी होण्यास सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 09:09 IST

आखाती देशांमधील युद्धाचा परिणाम कांदा निर्यातीवरही झाला आहे.

नवी मुंबई : आखाती देशांमधील युद्धाचा परिणाम कांदा निर्यातीवरही झाला आहे. निर्यात कमी झाल्यामुळे स्थानिक मार्केटमधील आवक प्रचंड वाढू लागली आहे. मुंबईसह राज्यातील अनेक बाजार समितीमध्ये मागणीपेक्षा दुप्पट आवक होऊ लागली असून, बाजारभाव कमी होण्यास सुरुवात  झाली आहे. आवक अशीच सुरू राहिली तर पुढील आठवड्यात दर घसरून शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रतिदिन ८०० ते ९०० टन कांद्याची गरज असते; परंतु सोमवारी एकाच दिवशी १,५५१ टन कांद्याची आवक झाली आहे. मार्चच्या पहिल्या दिवसापासून आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. युद्धामुळे निर्यातीवर परिणाम झाला आहे. यामुळे शेतकरी माल बाजार समितीमध्ये पाठवू लागले आहेत. 

बाजार समितीमध्ये ८ ते १५ रुपये किलो दराने विकला जाणाऱ्या कांद्याचे दर ७ ते १४ रुपयांवर आले आहेत. किरकोळ बाजारातही कांदा १५ ते २५ रुपये किलो दराने विकला जात आहे. निर्यात सुरू झाली नाही तर आवक वाढून दर अजून घसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नवीन कांद्याची आवकही सुरू झाली असल्यामुळे मुंबईसह राज्यातील सर्वच बाजार समितीमध्ये कांद्याची प्रचंड आवक होत आहे. आवक वाढल्यामुळे दर काही प्रमाणात कमी झाले आहेत.अशोक वाळुंज, संचालक, मुंबई बाजार समिती. 

१८ रुपये किलोने विक्री

सोमवारी सोलापूरमध्ये सर्वाधिक ४,१२३ टन आवक झाली आहे. खराब कांदा १ रुपया किलोपासून चांगला कांदा १८ रुपये किलोने विकला गेला. 

मालेगाव, मुंगसे व पिंपळगाव बसवंत या  बाजार समितीमध्येही एकाच दिवशी २ हजार टनपेक्षा जास्त आवक झाली आहे.  कांद्याचे दर घसरत असल्याने शेतकरी रडकुंडीला आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Gulf War Impacts Onion Exports, Prices Fall Amidst Increased Supply.

Web Summary : Gulf war reduced onion exports, causing a surge in local market supply. Prices have begun to fall across Maharashtra, potentially harming farmers. Mumbai saw a massive increase in onion arrival, exceeding demand.
टॅग्स :onionकांदाWarयुद्ध