दासगाव अपघातात एक जखमी
By Admin | Updated: April 11, 2016 01:32 IST2016-04-11T01:32:40+5:302016-04-11T01:32:40+5:30
मुंबई-गोवा महामार्गावर दासगाव गावचे हद्दीत शनिवारी (९ एप्रिल) रात्री ११.३० च्या सुमारास मुंबई दिशेला जाणाऱ्या एसटी बसला एक पिकअप जीप उजव्या बाजूला घासत

दासगाव अपघातात एक जखमी
दासगांव : मुंबई-गोवा महामार्गावर दासगाव गावचे हद्दीत शनिवारी (९ एप्रिल) रात्री ११.३० च्या सुमारास मुंबई दिशेला जाणाऱ्या एसटी बसला एक पिकअप जीप उजव्या बाजूला घासत नेल्याने एसटीमधील एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे.
एसटी चालक लालू उमर सा. सय्यद यांच्या फिर्यादीनुसार राजापूर ते बोरीवली एसटी बस (एमएच २० बीएल २११७) ही शनिवारी रात्री ११.३० च्या सुमारास दासगांव गावचे हद्दीत आल्यानंतर मुंबईहून गोवा दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात पिकअप जीपने एसटी बसच्या उजव्या बाजूस घासले. यामध्ये लांजा येथील प्रवासी नरेश जगन्नाथ पेडणेकर हे गंभीर जखमी झाले. जखमींवर महाड सरकारी रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले. या प्रवाशाला तातडीची मदत एक हजार रुपये एसटी महामंडळाकडून करण्यात आली, असून मुंबई येथे उपचारासाठी नेण्याची जबाबदारी मंडळाने घेतल्याची माहिती स्थानकप्रमुख शिवाजी जाधव यांनी दिली. अज्ञात वाहनाविरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)