लोकलमधून पडून एकाचा मृत्यू
By Admin | Updated: December 26, 2016 06:25 IST2016-12-26T06:25:14+5:302016-12-26T06:25:14+5:30
हार्बर मार्गावरील जुईनगर आणि नेरुळ स्थानकादरम्यान लोकलमधून पडल्याने एकाच मृत्यू झाली. ही घटना शुक्रवारी घडली. चेंबूर येथे राहणारे

लोकलमधून पडून एकाचा मृत्यू
नवी मुंबई : हार्बर मार्गावरील जुईनगर आणि नेरुळ स्थानकादरम्यान लोकलमधून पडल्याने एकाच मृत्यू झाली. ही घटना शुक्रवारी घडली. चेंबूर येथे राहणारे ४६ वर्षीय दादा काळे हे हार्बर मार्गावरून प्रवास करत असताना तोल गेल्याने धावत्या लोकलमधून पडून गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर त्वरित काळे यांना वाशीतील महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. कामानिमित्त नवी मुंबईच्या दिशेने प्रवास करताना काळे यांचा हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)