पोस्ट कर्मचाऱ्यांचा एक दिवसीय संप
By Admin | Updated: March 17, 2017 05:51 IST2017-03-17T05:51:16+5:302017-03-17T05:51:16+5:30
विविध मागण्यांसाठी पनवेलमधील टपाल विभागातील दोन्ही मान्यताप्राप्त संघटनांनी गुरुवार, १६ मार्च रोजी एक दिवसीय संप पुकारला होता.

पोस्ट कर्मचाऱ्यांचा एक दिवसीय संप
पनवेल : विविध मागण्यांसाठी पनवेलमधील टपाल विभागातील दोन्ही मान्यताप्राप्त संघटनांनी गुरुवार, १६ मार्च रोजी एक दिवसीय संप पुकारला होता. या संपात पनवेलमधील सर्व कर्मचारी सहभागी झाले होते. या संपामुळे मात्र टपाल कार्यालयात येणाऱ्या ग्राहकांची गैरसोय झाली.
सकाळी ८ वाजल्यापासून ते दुपारी ५ वाजेपर्यंत विविध मागण्यांसाठी टपाल कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. किमान वेतन २६ हजार रुपये करा व त्याचा लाभ १ जानेवारी, २०१६ पासून देण्यात यावा, घरभाडे भत्ता ३० टक्के, २० टक्के, १० टक्के पूर्वीप्रमाणेच मिळावा, प्रवास भत्ता ५ हजार रुपये मिळावा, नवीन पेन्शन योजना रद्द करून २००४ नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा, महिला कर्मचाऱ्यांसाठी कपात केलेली २० टक्के बाल संगोपनाची रजा पुन्हा लागू करा, फेस्टिवल व इतर रद्द केलेले भत्ते पुन्हा लागू करणे, बढती करता व्हेरी गुड हा मार्क-रिमार्क रद्द करा, सर्व केडरमधील रिक्त जागा १०० टक्के भरा व मूळ वेतनात पाच टक्के वेतनवाढ द्या, अशा प्रकारच्या मागण्यांसाठी टपाल कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय संप पुकारला होता. या वेळी अजय जाधव, सदानंद नाईक, नौशाद दनदने, एमडी पाटील, संदीप पाटील, धनंजय इंगोले आदी संपात सहभागी झाले होते.
दिवसभर टपाल कार्यालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकांच्या कामाचा मात्र खोळंबा झाला. (वार्ताहर)