जेएनपीटीच्या चौथ्या बंदरातील जसखार पोलीस ठाण्याच्या समोरील पुलाखालील रस्त्यावर कच्च्या तेलाने भरलेला कंटेनर पलटी झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. या अपघातामुळे रस्त्यावरच तेल पसरल्याने या कंटेनर मार्गावरील वाहतूक सुमारे तीन तास ठप्प झाली होती.जेएनपीटी आणि सिडकोच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी रस्त्यावर पसरलेल्या तेलाची साफसफाई केली. त्यानंतरच कंटेनर मालाची वाहतूक सुरू करण्यात आली. बुधवारी सकाळी जेएनपीटीच्या चौथ्या बंदरातून तेलाने भरलेला कंटेनर निघाला होता.जसखार पोलीस ठाण्याच्या समोरील पुलाखालील रस्त्यावर कच्च्या तेलाने भरलेला कंटेनर पलटी झाला. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच नागरिकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. या प्रकरणी न्हावा-शेवा बंदर पोलीस ठाण्यात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
उरणमध्ये तेलाचा कंटेनर कलंडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 23:20 IST