शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

आता सीआरझेडची परवानगी न घेता बिनधास्त करा ३०० चौमीपर्यंतची बांधकामे

By नारायण जाधव | Updated: October 20, 2023 18:41 IST

कोकणकिनारपट्टीसह नवी मुंबई, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील मच्छीमार, कोळीवाडे, मूळ गावठाणे आणि सीआरझेड क्षेत्रामध्ये राहणाऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा आहे.

नवी मुंबई : सागर किनारा प्राधिकरणाने अर्थात महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ॲथॉरिटीने केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाच्या निर्देशानुसार आता सीआरझेड क्षेत्रात तीनशे चौरस मीटरपर्यंतच्या घराच्या बांधकाम परवानगीचे अधिकार जिल्हाधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांकडे साेपविले आहेत.१८ ऑक्टोबर २०२३ रोजी सागर किनारा प्राधिकरणाने सदस्य सचिव तथा पर्यावरण संचालक अभय पिपंरकर यांच्या सहीने काढलेला हा निर्णय कोकणकिनारपट्टीसह नवी मुंबई, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील मच्छीमार, कोळीवाडे, मूळ गावठाणे आणि सीआरझेड क्षेत्रामध्ये राहणाऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा आहे. यामुळे आता राज्याच्या किनारपट्टीवर ३०० चौमीपर्यंत बांधकाम करायचे झाल्यास त्याच्या परवानगीसाठी सीआरझेड प्राधिकरणाकडे जाण्याची गरज भासणार नाही. आपल्या स्थानिक नगरपालिका, महापालिकेसह जिल्हा प्रशासनस्तरावरच ती मिळणार आहे.

देशात समुद्रकिनारी तसेच खाडीकिनाऱ्यासाठी सीआरझेड हा कायदा लागू आहे. या कायद्याअंतर्गत बांधकामे, प्रकल्प तसेच इतर उपक्रम यासंदर्भात नियमावली आहे. १९८१ साली बनलेल्या या कायद्यामध्ये वेळोवेळी बदल झाले आहेत. सरकारने सीआरझेड क्षेत्रातील बांधकामासंदर्भात बांधकामाची मर्यादा नुकतीच पन्नास मीटरपर्यंत कमी केल्याचे जाहीर केली आहे.

समुद्र किनारपट्टी अथवा खाडीपासून पाचशे मीटरपर्यंत कोणतेही बांधकाम अथवा उद्योग करावयाचा असेल तर राज्य व केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाचा ना हरकत दाखला आवश्यक होता. ही प्रक्रिया वेळखाऊ आणि किचकट होती. यामुळे किनारपट्टीवरील विविध गाव, गावठाणांसह कोळीवाड्यातील रहिवासी विविध मच्छीमार व सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधींनी यासंदर्भात सरकारकडे प्रक्रिया सुलभ करण्याची मागणी केली होती. अखेर त्यावर सरकारने सकारात्मक विचार करून किनारपट्टीसह सीआरझेड क्षेत्रात येणाऱ्या रहिवाशांसाठी हा दिलासादायक निर्णय घेतला आहे.

साडेबारा टक्केसह मूळ गावठाणांना होणार फायदानवी मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात विस्तीर्ण असा सागरकिनारा, खाडीकिनारा आहे. अख्खे नवी मुंबई शहरच सीआरझेडमध्ये मोडते. येथील प्रकल्पग्रस्तांना सिडकोने दिलेल्या साडेबारा टक्के योजनेच्या भूखंडासह सिडकोचे बहुतेक भूखंड सीआरझेडमध्ये मोडतात. यातील साडेबारा टक्केचे बहुतेक भूखंड हे ३०० चौमीपेक्षा कमी क्षेत्राचे आहेत. तसेच मूळ गावठाणातील ग्रामस्थांची वडिलोपार्जित घरेही त्यापेक्षा कमी क्षेत्रफळावर बांधलेली आहेत. कालौघात यातील अनेक घरे जीर्ण झालेली आहेत. ती तोडून नव्याने बांधायची झाल्यास सीआरझेड प्राधिकरणाची परवानगी लागते. मात्र, आता नव्या नियमानुसार ३०० चौमीपर्यंतच्या क्षेत्रफळावरील घरांना ती लागणार नाही. स्थानिक महापालिका, नगरपालिकेला याचे अधिकार केंद्र आणि राज्य शासनाने या निर्णयाद्वारे दिले आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई