शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आता रेल्वेतल्या चादरींची होतेय चोरी, बुधवारी उघडकीस आला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 08:16 IST

हापा-मडगाव एक्स्प्रेसमधील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : रेल्वेने लांबच्या पल्ल्याच्या गाड्यांमध्ये एसी डब्यात उपलब्ध करून दिलेल्या चादरीदेखील चोरीला जाऊ लागल्याचे प्रकार घडू लागले आहेत. हापा-मडगाव एक्स्प्रेसमध्ये बुधवारी असा प्रकार उघडकीस आला असून, काही दिवसांत २८ चादरी चोरीला गेल्या आहेत. या चादरी प्रवाशांनी पळवल्या की अज्ञात चोरट्याने याचा उलगडा मात्र झालेला नाही. यावरून लांब पल्ल्याच्या रेल्वेत चोरट्यांचा सुळसुळाट सुटल्याचे उघड होत आहे.

लांबच्या पल्ल्याच्या रेल्वेत प्रवाशांचे मोबाइल किंवा इतर महागडा ऐवज चोरीला गेल्याच्या घटना सतत घडत असतात. अशातच रेल्वेतल्या चादरीदेखील चोरीला जाऊ लागल्याचे उघड झाले आहे. लांबच्या मार्गावर धावणाऱ्या रेल्वेत एसी डब्यात प्रवाशांसाठी रेल्वेने चादरी उपलब्ध करून दिल्या आहेत. रेल्वेचा प्रवास संपल्यानंतर या चादरी एकत्र करून डब्यात  ठेवल्या जातात. परंतु, हापा-मडगाव एक्स्प्रेसमधील अशा २८ चादरी गायब असल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यावरून अज्ञाताने या चादरी चोरल्याची शक्यता वर्तवून पनवेल रेल्वे पोलिसांकडे बुधवारी तक्रार केली आहे. त्याद्वारे १९ हजार रुपये किमतीच्या चादरींच्या चोरीप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

 

टॅग्स :railwayरेल्वेCrime Newsगुन्हेगारी