कामाबाबत ठेकेदाराला नोटीस
By Admin | Updated: March 4, 2016 01:50 IST2016-03-04T01:50:00+5:302016-03-04T01:50:00+5:30
रेल्वे स्थानकावर जुना पादचारी पूल तोडून त्या ठिकाणी जास्त उंचीचा नवीन पादचारी पूल बांधण्यात आला. जुन्या पुलाच्या पायऱ्या मुंबईच्या दिशेकडे होत्या.

कामाबाबत ठेकेदाराला नोटीस
कर्जत : रेल्वे स्थानकावर जुना पादचारी पूल तोडून त्या ठिकाणी जास्त उंचीचा नवीन पादचारी पूल बांधण्यात आला. जुन्या पुलाच्या पायऱ्या मुंबईच्या दिशेकडे होत्या. मात्र नवीन पुलाच्या पायऱ्या ठेकेदाराने लोणावळ्याच्या दिशेने उतरवल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. याबाबत अनेक वेळा आवाज उठविण्यात आला, मात्र रेल्वे प्रशासन गप्प आहे. याबाबत कर्जत रेल्वे प्रवासी संघाचे सदस्य पंकज ओसवाल यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागवली होेती. त्यामध्ये पुलाच्या जिन्याचे काम ठेकेदार करीत नसल्यामुळे ठेकेदाराला नोटीस काढण्यात आली आहे, असे रेल्वे प्रशासनाने ओसवाल यांना लेखी स्वरूपात कळविले आहे. म्हणजे कर्जतकरांना मुंबईच्या दिशेकडील पायऱ्यांसाठी आणखी किती वर्षे वाट पाहावी लागणार, अशी संतप्त प्रतिक्रिया कर्जत रेल्वे प्रवासी संघाचे सदस्य पंकज ओसवाल यांनी व्यक्त केली आहे.
कर्जत रेल्वे स्थानकावरील काही वर्षांपूर्वी जुना पादचारी पूल पाडून त्या ठिकाणी नवीन पादचारी पूल बांधण्यात आला. नवीन पुलाची उंची जुन्या पुलापेक्षा जास्त करण्यात आली. त्यावेळी फलाट क्र मांक दोन व तीनकडे जाण्यासाठी लोणावळा बाजूकडे पायऱ्या तयार करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. काही वर्षांपूर्वी तांत्रिक कारणासाठी जुना पूल पाडून नवीन पूल बांधण्यात आला. त्यावरून वृद्ध किंवा आजारी प्रवासी जाणे शक्य नाही. जुन्या पुलाच्या पायऱ्या मुंबईच्या दिशेला होत्या.
नवीन पुलाच्या पायऱ्या विरुद्ध दिशेला म्हणजे लोणावळा दिशेला करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना वळसा घालून दोन व तीन क्र मांकाच्या तसेच ईएमयू फलाटावरील गाड्या पकडण्यासाठी धावपळ करावी लागते. याबाबत कर्जतकरांमध्ये तीव्र नाराजी पसरली.
कर्जतकरांच्या रेल्वे समस्यांविषयी आवाज उठवणारे पंकज ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनाला याबाबतीत जाब विचारला असता, कर्जतकरांची गैरसोय होऊ नये म्हणूनच पुलाच्या पायऱ्या लोणावळ्याच्या दिशेकडे बांधण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले. रेल्वे प्रशानाने या बाबतीत खुलासा देताना असे म्हटले आहे, की नव्याने बांधण्यात येणारा पादचारी पूल आधी बांधण्यात आला. त्यामुळे जुन्या पुलाच्या पायऱ्या मुंबई दिशेकडे होत्या. त्या आधी काढल्या असत्या तर प्रवाशांना दोन क्र मांकाच्या फलाटावरून जाणे शक्य झाले नसते. जुना व नवीन दोन्ही पुलांची उंची वेगळी असल्यामुळे जुन्या पुलाच्या पायऱ्या नवीन पुलाला जोडणे शक्य नव्हते, असे रेल्वे प्रशासनाने पंकज ओसवाल यांच्याकडे खुलासा केला आहे.
हे काम १ नोहेंबर २०१५ ला सुरू होण्याची शक्यता आहे, असे ओसवाल यांना कळविले होते. मात्र फेबु्रवारी २०१६ उजाडला तरीही कामाचा पत्ता नसल्याने याबाबतीत पुन्हा विचारण केली असता रेल्वे प्रशासनाने ठेकेदारानेच तसे लिहून दिल्यामुळे आम्ही तुम्हाला असे कळविले होते, असे सांगितले. मात्र ठेकेदार कामच करीत नसल्यामुळे आता रेल्वे प्रशासनाने त्या ठेकेदारास ८ डिसेंबर २०१५ ला नोटीस बजावली आहे. ठेकेदाराच्या झालेल्या कराराप्रमाणे कारवाई केली आहे, असे रेल्वे प्रशासनाने कळविले.