आमचे कधी कोणी कौतुक केलेच नाही!

By Admin | Updated: October 16, 2014 23:00 IST2014-10-16T23:00:00+5:302014-10-16T23:00:00+5:30

बघावे तेव्हा ए रिक्षावाला, अशा एकेरी शब्दाने आम्हाला समाजात स्थान मिळते.

No one ever appreciated! | आमचे कधी कोणी कौतुक केलेच नाही!

आमचे कधी कोणी कौतुक केलेच नाही!

अनिकेत घमंडी ल्ल डोंबिवली
बघावे तेव्हा ए रिक्षावाला, अशा एकेरी शब्दाने आम्हाला समाजात स्थान मिळते. कोणीही चारचाकी, दुचाकी स्वार आला की ते घोडय़ावरच असल्याने त्यांना वाट काढून द्यायची, साईड नाही दिली तर त्यांनी आम्हाला शिव्यांची लाखोली वहायची. तरीही केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी व कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आम्ही रिक्षा चालवतो. अनेकदा कंपनी अचानक बंद पडणो, घरात कोणी आजारी असणो अथवा शिक्षणाची कमतरता असणो अशा अनेक कारणांमुळे इच्छा नसतांनाही केवळ पर्याय नाही म्हणून आम्ही या व्यवसायात येतो. पण असे असले तरी आम्हालाही मने असतात, त्यांच्यातही उपद्रवी सोडले तर चांगल्या व्यक्ती असतात. मात्र अशातच जर आमच्यातील चांगल्या कलागुणांना कोणी ओळखून पाठीवर कौतुकाची थाप मारली तर एखादे आव्हान पेलायची ताकद आमच्यात निर्माण होते, अशा भावपूर्ण उद्गारांनी डोंबिवलीकरांना गहीवरुन टाकले. निमित्त होते ते आदर्श रिक्षाचालक पुरस्कार वितरण सोहोळय़ाचे. 
डोंबिवली वाहतूक शाखा, रोटरी क्लब-डोंबिवली प. आणि इनरव्हील डोंबिवली पश्चिम, ईगल ब्रिगेड संस्थेच्या माध्यमातून डोंबिवलीतील गुणवंत रिक्षाचालकांचा नुकताच सन्मान करण्यात आला.  त्यावेळी रिक्षा चालक-मालक युनीयनचे पदाधिकारी शेखर  जोशी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमाची मुळ संकल्पना वरिष्ठ पोलिस निरीक्षक सजेर्राव पाटील, ईगल ब्रिगेडचे संस्थापक विश्वनाथ बिवलकर ,रोटरी क्लबचे  राहुल गणपुले, इनरव्हीलच्या माधवी पटवर्धन यांची होती. हा उपक्रम स्तुत्य असल्याचेही जोशी म्हणाले. आमचा गौरव आजपयर्ंत कोणी केला नाही असे मत रिक्षावाल्यांनी व्यक्त केले. 
 
गुप्ता यांस आदर्श रिक्षाचालक पुरस्कार : एका प्रवाशाचा रिक्षामध्ये विसरुन गेलेला मोबाईल आणि मौल्यवान दागिने ज्याचे आहेत त्याची ओळख पटवून परत दिल्याबद्दल दिनेश नारायण गुप्ता यांस आदर्श रिक्षावाला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.  विभागीय पोलिस आयुक्त वाहतूक विभाग-ठाणो यांच्या वतीने डॉ. रश्मी करंदीकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. त्याचबरोबर प्रामाणिकपणो रिक्षा चालवणा-या रिक्षावाल्यांचा देखील यावेळी गौरव करण्यात आला.

 

Web Title: No one ever appreciated!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.