शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मद्यपी चालकांचा परवाना होणार रद्द, चोख बंदोबस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 04:28 IST

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नववर्षाच्या स्वागताचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळतो. या उत्साहाच्या वातावरणात शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वाहतूक पोलीस सज्ज झाले आहेत.

पनवेल : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नववर्षाच्या स्वागताचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळतो. या उत्साहाच्या वातावरणात शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वाहतूक पोलीस सज्ज झाले आहेत. परिसरात कोणतेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. ३१ डिसेंबरला रात्रभर पोलीस गस्तीवर राहणार आहेत. चालकांनी मद्यपान करून वाहन चालवू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.वर्षाच्या शेवटच्या रात्री विविध ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन केले जाते. मद्यपान करून वाहन चालवल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होतात व त्यामुळे काहींचा हकनाक जीव जातो. हे प्रकार रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी शहरातील धडक कारवाई सुरू केली आहे. ३१ डिसेंबर रोजी शहरातील महत्त्वाचे चौक, रस्ते, शहराचे प्रवेशद्वार येथे ब्रेथ अ‍ॅनालायझरसह पोलीस बंदोबस्तात उपस्थित राहणार आहेत.नववर्षाच्या स्वागताच्या रात्री सायंकाळपासून प्रत्येक चौकात वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. मोठ्या चौकांमध्ये ड्रंक अँड ड्राइव्हची कारवाई केली जाणार आहे. दारू पिऊन गाडी चालविणाऱ्यांविरोधात खटले दाखल केले जाणार आहेत. त्यांचे लायसन्सही रद्द करण्यासाठी आरटीओकडे पाठविले जाणार असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे. ३१ डिसेंबरच्या जल्लोषाला गालबोट लागू नये यासाठी पोलिसांनी देखील कंबर कसली आहे. या वेळी पेट्रोलिंग देखील सुरू राहणार आहे.पनवेल वाहतूक पोलिसांकडे ३ ब्रेथ अ‍ॅनालायझर मशिन, खारघर वाहतूक पोलिसांकडे २ मशिन, तळोजा वाहतूक पोलिसांकडे १ मशिन, नवीन पनवेल वाहतूक पोलिसांकडे २ मशिन, गव्हाण फाटा वाहतूक पोलिसांकडे १ मशिन, कळंबोली वाहतूक पोलिसांकडे ३ ब्रेथ अ‍ॅनालायझर मशिन आहेत. पनवेल वाहतूक पोलीस आदई सर्कल, पळस्पेजवळ, कळंबोली पोलीस ८ ठिकाणी, नवीन पनवेल पोलीस ५ ठिकाणी, खारघर पोलीस बेलपाडा, हिरानंदानी व कोपरा गावाजवळ, तळोजा पोलीस आयजीपीएल, धानसर टोलनाका, नावडा फाटा, गव्हाण वाहतूक पोलीस गव्हाण फाटा व पाडेघर येथे ब्रेथ अ‍ॅनालायझरसह बंदोबस्त ठेवणार आहेत.घरी आपले कोणीतरी वाट पाहत आहे त्यामुळे नागरिकांनी स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी दारू पिऊन गाडी चालवू नये, वाहतुकीचे नियम पाळा, असे आवाहन पनवेल वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अभिजित मोहिते यांनी केले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसNavi Mumbaiनवी मुंबई