एनएमएमटीचे मोबाइल अ‍ॅप

By Admin | Updated: March 4, 2016 01:59 IST2016-03-04T01:59:08+5:302016-03-04T01:59:08+5:30

विविध कारणांमुळे घसरलेली एनएमएमटीची प्रवासी सेवा आता रुळावर येताना दिसत आहे. मागील दीड दोन वर्षात उपक्रमात अनेक नवनवीन प्रयोग करण्यात आले आहेत.

NMMT Mobile App | एनएमएमटीचे मोबाइल अ‍ॅप

एनएमएमटीचे मोबाइल अ‍ॅप

नवी मुंबई : विविध कारणांमुळे घसरलेली एनएमएमटीची प्रवासी सेवा आता रुळावर येताना दिसत आहे. मागील दीड दोन वर्षात उपक्रमात अनेक नवनवीन प्रयोग करण्यात आले आहेत. याचाच एक भाग म्हणून उपक्रमाने आता मोबाइल अ‍ॅप तयार केला आहे. याद्वारे प्रवाशांना तिकीट आणि पासेस आॅनलाइन घेता येणार आहेत. सध्या ही सुविधा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे.
एनएमएमटी-आरटी हे या अ‍ॅपचे नाव आहे. हे मोबाइल अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर त्याच्या सहाय्याने प्रवास सुरू होण्याआधीच एक किंवा अनेक तिकिटे आणि पास काढण्यास मदत होणार आहे. या अ‍ॅप्लिकेशनमध्ये पेमेण्ट गेटवेही उपलब्ध करून देण्यात आल्याने तत्काळ पेमेण्ट करणेही शक्य होणार आहे.
या अ‍ॅप्लिकेशनमध्ये पास काढण्याची प्रक्रि या पूर्णपणे डिजिटल असल्याचा सर्वात जास्त फायदा विद्यार्थी आणि मासिक पास काढणाऱ्या प्रवाशांना होणार आहे. पासकरिता लागणारे सर्व दस्तावेज अतिशय सहजपणे अपलोड करता येणार असून त्यांची पडताळणी देखील एनएमएमटीच्या अधिकाऱ्यांमार्फत आॅनलाइन पद्धतीनेच होणार आहे. त्यामुळे कागदोपत्री व्यवहार करावे लागणार नाहीत. या अ‍ॅपच्या दाखलीकरणाबद्दल बोलताना एआॅन सॉफ्टवेअर प्रा. लि. या कंपनीने हा मोबाइल अ‍ॅप तयार केला आहे. कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना जोसेफ यांनी अलीकडेच या अ‍ॅपसंदर्भात अधिकारी वर्गाला माहिती दिली. (प्रतिनिधी)

Web Title: NMMT Mobile App