उरण विभागासाठी एनएमएमटीच्या जादा बसेस

By Admin | Updated: December 8, 2015 00:56 IST2015-12-08T00:56:02+5:302015-12-08T00:56:02+5:30

वाशी ते उरण या मार्गातील प्रवासीसंख्या तसेच यातून होणाऱ्या फायद्यामुळे या मार्गावर नवी मुंबई महानरपालिका परिवहन उपक्रमाने जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे

NMMT extra buses for Uran division | उरण विभागासाठी एनएमएमटीच्या जादा बसेस

उरण विभागासाठी एनएमएमटीच्या जादा बसेस

नवी मुंबई : वाशी ते उरण या मार्गातील प्रवासीसंख्या तसेच यातून होणाऱ्या फायद्यामुळे या मार्गावर नवी मुंबई महानरपालिका परिवहन उपक्रमाने जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. वाशी विभागातून संध्याकाळी ६ ते ८ वाजेच्या दरम्यान अतिरिक्त गाड्या सोडण्याचा निर्णय एनएमएमटीने घेतला आहे.
कोपरखैरणेतून उरणकडे जाणाऱ्या ३१ क्रमांकाच्या बसेसच्या फेऱ्या कमी होत असल्याने या मार्गावरील प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याने उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांनी यासंदर्भात जादा बसेस सोडण्याची मागणी एनएमएमटीकडे केली. संध्याकाळी ६ ते ८ वाजेच्या दरम्यान या एखादी बस जरी हुकली तरी प्रवाशांना तासभर बसची वाट बघत ताटकळत उभे राहावे लागत असल्याचे पाटील यांनी सांगितले. उरण उत्कर्ष समितीच्या मागणीची दखल घेत नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमांतर्गत जादा बस गाड्या सोडण्याचा निर्णय झाला. चाल/वाहक कर्मचारी संख्या अपुरी असल्याने ही समस्या निर्माण झाल्याची माहिती परिवहन विभागाने दिली. या मार्गावरील प्रवाशांची गैरसोय टाळण्याकरिता उरण उत्कर्ष समितीच्या वतीने एनएमएमटीने चांगल्या सोयी-सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी केली होती.

Web Title: NMMT extra buses for Uran division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.