पनवेलमध्ये एनएमएमटी बससेवा

By Admin | Updated: October 8, 2015 23:40 IST2015-10-08T23:40:07+5:302015-10-08T23:40:07+5:30

शहरात नगरपरिषदेच्या स्वत:च्या मालकीची बससेवा सुरू होण्यापूर्वीच नवी मुंबई महानगरपालिकेने राबविलेल्या परिवहन उपक्रमाअंतर्गत एनएमएमटी बससेवा सुरू करण्यात येत

NMMT bus service in Panvel | पनवेलमध्ये एनएमएमटी बससेवा

पनवेलमध्ये एनएमएमटी बससेवा

पनवेल : शहरात नगरपरिषदेच्या स्वत:च्या मालकीची बससेवा सुरू होण्यापूर्वीच नवी मुंबई महानगरपालिकेने राबविलेल्या परिवहन उपक्रमाअंतर्गत एनएमएमटी बससेवा सुरू करण्यात येत आहे. शुक्रवारी ही बस पनवेलमध्ये धावणार आहे. पनवेल रेल्वे स्थानक ते साई नगर या मार्गावर ही बस सुरू होणार
आहे.
सिटीझन युनिटी फोरम आणि जनजागृती ग्राहक मंच पनवेल शाखा यांच्या पाठपुराव्यामुळे पनवेल नगरपरिषदेने ही बससेवा सुरु करण्याची परवानगी दिली आहे. पनवेल रेल्वे स्थानक, पनवेल बस स्थानक, नवीन पनवेल उड्डाणपूल, ठाणा नाका, कफनगर, सारस्वत बँक, तालुका पोलीस ठाणे, वाल्मीकी नगर, नगर पालिका, दर्गा नाका, लायन गार्डन, काळण समाज हॉल, प्रांत कार्यालय, गुरुपुष्प सोसायटी, साई रत्नदीप सोसायटी साईनगर आदी ठिकाणावर ही बस थांबणार आहे.
पनवेल रेल्वे स्थानक ते साईनगर ही पहिली बसफेरी सकाळी ७.१८ मिनिटांनी तर शेवटची बस रात्री ८.३६ मिनिटांनी तसेच साईनगर ते पनवेल रेल्वे स्थानक पहिली बस सकाळी ७ वाजता व शेवटची बस ८.५६ मिनिटांनी सुटणार आहे. दर १५ ते १८ मिनिटांनी बस सुटेल. शहरात अनेक वर्षांपासून अशाप्रकारची परिवहन सेवा सुरु करण्याची मागणी नागरिकांकडून होत होती. ती आता पूर्ण झाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: NMMT bus service in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.