शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई: वाशीत कारमध्ये १६ लाख रुपयांची रोकड सापडली, आचारसंहिता पथकाची कारवाई
2
"पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांना वेळीच फोन केला असता तर...!"; अमेरिकन वाणिज्यमंत्र्याचा मोठा खुलासा
3
'स्टॉपेज रेशो'ने वाढवली धाकधूक! गुंतवणूकदार म्यॅुच्युअल फंडातून का पडतायत बाहेर?
4
सबरीमाला मंदिरातील सोन्याच्या चोरी प्रकरणी मुख्य पुजारी ताब्यात, एसआयटीची कारवाई   
5
एस जयशंकर यांना अमेरिकेत करावा लागला रस्त्याने ६७० किमी प्रवास; बलाढ्य अमेरिकेवर ट्रम्प यांनी ही काय वेळ आणली...
6
‘महायुती सत्तेवर आली तरी मुंबईचं बॉम्बे होणार नाही, पण उद्धव ठाकरे सत्तेवर आले तर...’, नितेश राणेंचा दावा 
7
कर्जबाजारी पाकिस्तानचा ओव्हर कॉन्फिडन्स; फायटर जेट विकून IMF चे कर्ज फेडण्याचा दावा
8
केवळ एकच व्हिडीओ, अन् यूट्युबवर लावली ‘आग’, केली ९ कोटींची कमाई, नेमकं काय आहे त्यात? 
9
PMC Election 2026: शिवसेना स्वबळावर लढत आहे, म्हणून कुणीही हलक्यात घेऊ नका; एकनाथ शिंदेंचा इशारा
10
"इम्तियाज जलील हा भाजपाचा हस्तक, त्याने शहराला..."; ठाकरेंच्या नेत्याचा घणाघात, फडणवीसांवरही 'बाण'
11
डोनाल्ड ट्रम्प यांची आर्थिक 'दादागिरी'? उदय कोटक यांनी २०२४ मध्येच केली होती भविष्यवाणी
12
स्टार क्रिकेटर Jasprit Bumrah चा 'रशियन सुंदरी' सोबतचा फोटो व्हायरल; कोण आहे 'ही' तरुणी?
13
Chanakya Niti: अपमान करणाऱ्याला कसं उत्तर द्यायचं? शिका चाणक्य नीतीचे 'हे' ५ वाग्बाण 
14
मोठा निष्काळजीपणा! नर्सने कापला दीड महिन्याच्या बाळाचा अंगठा, नेमकं काय घडलं?
15
० ० ० ० ० ० ... ६ चेंडूत हव्या होत्या ६ धावा... महाराष्ट्राचा 'जादूगार' रामकृष्णने जिंकवली मॅच
16
तुमचा iPhone हॅक तर झाला नाही ना? 'या' ४ गोष्टी दिसताच समजा कुणीतरी करतंय तुमची हेरगिरी
17
इराणच्या 'या' निर्णयाचा भारताला मोठा फटका, 2000 कोटी रुपयांवर आडलं घोडं...! काय आहे संपूर्ण प्रकरण?
18
भारतीय क्रिकेट विश्वावर शोककळा; मैदानावरच फलंदाजाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
19
Malegaon Municipal Election 2026 : भाजपच्या दोन बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी, वरिष्ठांच्या आदेशान्वये कारवाई
20
अपघातग्रस्तावर मोफत उपचार! मदत करणाऱ्याला ₹25 हजारांचे बक्षीस; मोदी सरकार आणतेय नवीन योजना
Daily Top 2Weekly Top 5

मत कुणाला? अनुभवी की युवा उमेदवाराला? २१ वर्षांचे दोघे, तर ७४ वर्षांचे ज्येष्ठही निवडणुकीच्या रिंगणात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 08:56 IST

सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवार निवडताना तरुणांना संधी देण्याबरोबर ज्येष्ठांचाही सन्मान राखला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : अनुभवी नगरसेवक महापालिकेत पाठवावा की अनुभवी आणि ज्येष्ठ, याचा फैसला मतदारांना करावा लागेल. नवी मुंबई महापालिकेच्या १११ जागांसाठी नशीब आजमावत असलेल्या ४९९ उमेदवारांमध्ये २१ वर्षांचे दोन युवा आहेत, तर सत्तरी पूर्ण केलेले दोघे आहेत. ३० ते ५० वयोगटातील सर्वाधिक २९३ उमेदवारांचा समावेश आहे.  सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवार निवडताना तरुणांना संधी देण्याबरोबर ज्येष्ठांचाही सन्मान राखला आहे. अनेक ज्येष्ठ नेत्यांनी कुटुंबातील तरुणांना रिंगणात उतरविले आहे.

शिंदेसेनेच्या सोनवी लाड व मनसेचे चेतन काळे हे दोन उमेदवार २१ वर्षांचे आहेत. दीक्षा कचरे ही २२ वर्षांची तरुणीही कोपरखैरणेतून उमेदवार आहे. २१ ते ३० वयोगटातील ५० जणांना पक्षांनी उमेदवारी दिली आहे. ६१ ते ७० वयाचे ३७ जण लढत आहेत. सत्तरीच्या पुढील दोघांचा समावेश आहे. उमेदवारांनी आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांतून ही माहिती मिळाली आहे.

ठाण्यात तिशीपर्यंतचे ९ उमेदवार मैदानात

ठाणे महापालिकेत २३ वर्षांच्या तरुणांपासून ते ७४ वर्षांच्या अनुभवी ज्येष्ठांपर्यंत उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यामुळे ही निवडणूक तरुणाई आणि अनुभव यांचा अनोखा संगम ठरत आहे.

या निवडणुकीतील सर्वांत लहान वयाचे उमेदवार २३ वर्षांचे असून, सर्वाधिक वयाचे उमेदवार ७४ वर्षांचे आहेत. विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक ३३ मध्ये दोन सर्वांत कमी वयाचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादी (शरद पवार)चे खांचे मोहम्मद जैद अनिफ खांचे हे प्रभाग क्रमांक ३३ ‘क’ मधून रिंगणात उतरले असून, त्यांच्याविरोधात भाजपच्या आतिया जावेद शेख या उमेदवार मैदानात आहेत. हे दोन्ही उमेदवार केवळ २३ वर्षांचे आहेत.

दुसरीकडे, वृद्ध व अनुभवी उमेदवारही निवडणुकीत सक्रिय आहेत. शिंदेसेनेचे देवराम भोईर हे प्रभाग क्रमांक ८ ‘क’ मधून रिंगणात असून ते ७४ वर्षांचे आहेत. त्यांच्यानंतर उद्धवसेनेचे सुखदेव उबाळे हे ७३ वर्षांचे आहेत.

भिवंडीत ८४ वर्षांच्या आज्जीही रिंगणात

भिवंडी : नगरसेवक निवडणुकीत २१ ते ३२ वयोगटातील तरुणांबरोबरच ८४ वर्षीय साखराबाई गेणू बगाडे रिंगणात आहेत. ५५ ते ८४ वयोगटातील ज्येष्ठही नशीब अजमावत आहेत. २१ वर्षांचे मित चौघुले हे पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या विरोधात २८ वर्षीय मयुरेश पाटील आहेत. ईशा इमरान खान या उमेदवार २३ वर्षे वयाच्या आहेत. तेजस काटेकर, सिद्धी पाटील व विराज पवार हे २४ वर्षांचे आहेत, तर दिव्या पाटील यांचे वय २६ वर्षे आहे. जावेद दळवी (६९), मनोज काटेकर (५९) विलास पाटील (५८), प्रकाश टावरे (६९), दक्षाबेन पटेल (६७), बाळाराम चौधरी (६१) हे ज्येष्ठ उमेदवार आहेत.

ठाण्यात सर्वपक्षीय उमेदवार ‘नामचीन’

ठाणे : सर्वपक्षीय उमेदवारांवर गंभीर, राजकीय व किरकोळ गुन्हे दाखल आहेत. माजी विरोधी पक्षनेते तसेच शिंदेसेनेचे उमेदवार देवराम भोईर यांच्याविरोधात १९९७ साली भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा दाखल होता. त्यांचे पुत्र संजय भोईर यांच्याविरोधात २०१२ मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. शिंदेसेनेचेच मनोज शिंदेंवर १४ गुन्हे प्रलंबित आहेत. याशिवाय, राष्ट्रवादी (अजित पवार) व राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षातही गुन्हेगार उमेदवार आहेत. 

भिवंडीत अनेक उमेदवारांवर गुन्हे

भिवंडी : अनेक उमेदवारांवर हत्या, मारहाण आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. माजी महापौर विलास पाटील यांच्यावर ४ गुन्हे दाखल आहेत. भाजपचे यशवंत टावरेंवर भिवंडी व उत्तर प्रदेशात दोन गुन्हे दाखल आहेत. संतोष शेट्टींवर ३, संजय म्हात्रे आणि माजी उपमहापौर मनोज काटेकर यांच्यावर प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. तर नीलेश चौधरी यांच्यावर एकूण पाच गुन्हे दाखल आहेत, तर राष्ट्रवादी (अजित पवार)चे  सुशांत म्हात्रे यांच्यावर नारपोली पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल आहे.

सत्तेची चावी ४० ते ५५ वयोगटाकडे

उल्हासनगर : महापालिका निवडणुकीत २४ वर्षांच्या अक्षता टाले या सर्वांत तरुण उमेदवार आहेत, तर ६७ वर्षीय राजेंद्रसिंग भुल्लर हे सर्वांत ज्येष्ठ उमेदवार आहेत. सर्वाधिक उमेदवार हे ४० ते ५५ वयोगटातील असून हा गटच पालिकेची सत्तेची चावी कोणाकडे जाणार, हे ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. यंदा २४ ते २८ वयोगटातील उच्चशिक्षित तरुणांचा सहभाग लक्षणीय आहे. तसेच ६० वर्षांवरील ज्येष्ठ उमेदवारांनी रंगत आणली आहे.

उल्हासनगरात २०% उमेदवार गुन्हेगार

उल्हासनगर : शिंदेसेनेचे उमेदवार राजेंद्र चौधरींवर सर्वाधिक १६ गुन्हे दाखल आहेत, तर भाजपचे प्रधान पाटील यांच्यावर विविध प्रकारचे पाच गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगारीमध्ये शिंदेसेनेचे उमेदवार आघाडीवर असल्याचे त्यांनी आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांवरून दिसून येते. दाखल गुन्ह्यांपैकी काही राजकीय आंदोलनातील गुन्हेही आहेत. दुसऱ्या क्रमांकावर शिंदेसेनेचे महेश सुखरामानी, धनंजय बोडारे व तिसरा क्रमांक भाजपचे प्रधान पाटील यांचा आहे. शिंदेसेनेचे अरुण अशान, चंद्रशेखर यादव, महेश सुखरामनी, दुर्गाप्रसाद राय आणि विजय पाटील यांसारख्या प्रमुख पदाधिकाऱ्यांवरही विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. अनेकजण जेलवारीही करून आले आहेत. 

सर्वांत कमी वय असलेले उमेदवार

उमदेवार     वयसोनवी लाड     २१कुणाल गवते     २१चेतन काळे     २१दिक्षा कचरे     २२भाग्यश्री साळवे २२शुभम चौगुले     २३सुदर्शन विघ्ने     २३नयन पाटील     २३तबस्सूम पटेल     २३प्राजक्ता भगत     २५कलीम पटेल     २६

सर्वांत जास्त वय असलेले उमेदवार

उमेदवार     वयएकनाथ माने     ७४कुरेशी जुल्फीकार अब्दुल सत्तार     ७१जयाजी नाथ     ६९कांतीलाल जैन     ६९प्रमोद जोशी     ६८मंदाकिनी कुंजीर     ६८देवराम सूर्यवंशी     ६८अनंत सुतार     ६७परशूराम मेहेर     ६७केशव म्हात्रे     ६७शशिकांत राऊत     ६७ 

English
हिंदी सारांश
Web Title : Experienced or young candidates? Voters to decide in municipal elections.

Web Summary : Navi Mumbai elections feature youth and seniors, with most candidates aged 30-50. Thane sees a blend of ages, while Bhiwandi has an 84-year-old contender. Many face criminal charges. Voters will decide between experience and youth.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Navi Mumbai Municipal Corporation Electionनवी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६Thane Municipal Corporation Electionठाणे महापालिका निवडणूक २०२६Bhiwandi Nizampur Municipal Corporation Electionभिवंडी-निजामपूर महानगरपालिका निवडणूक २०२६Ulhasnagar Municipal Corporation Electionउल्हासनगर महानगरपालिका निवडणूक २०२६