नऊ महिने पगारापासून वंचित

By Admin | Updated: November 11, 2014 23:11 IST2014-11-11T23:11:37+5:302014-11-11T23:11:37+5:30

वाडा ग्रामीण रुग्णालयातील तीन सुरक्षारक्षकांना नऊ महिन्यांपासून पगार मिळाला नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.

Nine months deprived of salary | नऊ महिने पगारापासून वंचित

नऊ महिने पगारापासून वंचित

वाडा : वाडा ग्रामीण रुग्णालयातील तीन सुरक्षारक्षकांना नऊ महिन्यांपासून पगार मिळाला नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. आरोग्य विभागाच्या वित्त खात्याकडे वारंवार अजर्-विनंत्या करूनही प्रशासन त्याकडे गांभीर्याने बघत नाही. पगार तत्काळ मिळावा, या मागणीसाठी तीन सुरक्षारक्षकांनी सोमवारपासून रुग्णालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
वाडा ग्रामीण रुग्णालयात रघुनाथ थुले, भगवान जाधव आणि सुभाष पाटील हे तीन सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहेत. ठाण्यातील सामान्य रुग्णालयाकडून त्यांच्या वेतनाची रक्कम वाडा ग्रामीण रुग्णालयात दिली जात होती. मात्र, फेब्रुवारी 2क्14 पासून ती मिळणो बंद झाले. त्यामुळे नऊ महिन्यांपासून ते हक्काच्या वेतनापासून वंचित आहेत. ते काही दिवस उसनवारी करून आपला प्रपंच चालवत होते. परंतु, आता उसनवारी मिळणो बंद झाले आहे. त्यामुळे त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे. उपसंचालक आरोग्य सेवा, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणो यांच्याकडे अजर्-विनंत्या करूनही ते याकडे दुर्लक्ष करीत असल्याने सुरक्षारक्षकांनी उपोषण केले.न्याय मिळेर्पयत हे सुरूच राहील, असा निर्धार त्यांनी केला आहे.
 
..तर रुग्णालयाला टाळे : श्रमजीवी संघटना
सुरक्षारक्षकांना तत्काळ वेतन न दिल्यास मंगळवारी ग्रामीण रुग्णालयाला टाळे ठोकू, असा गंभीर इशारा श्रमजीवी संघटनेचे तालुकाध्यक्ष मिलिंद थुळे व संघटक किशोर मढवी यांनी प्रशासनाला दिला आहे. वाडय़ाचे तहसीलदार संदीप चव्हाण यांनी उपोषणकत्र्याची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र, त्यांनी ती फेटाळली.

 

Web Title: Nine months deprived of salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.