महापालिका सुरू करणार रात्रशाळा
By Admin | Updated: September 9, 2015 23:57 IST2015-09-09T23:57:50+5:302015-09-09T23:57:50+5:30
झोपडपट्टी परिसरात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी रात्रशाळा सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
महापालिका सुरू करणार रात्रशाळा
नवी मुंबई : झोपडपट्टी परिसरात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी रात्रशाळा सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
अत्याधुनिक व उच्च शिक्षणाचे राज्यातील सर्वात प्रमुख केंद्र म्हणून नवी मुंबईची ओळख निर्माण झाली आहे. देशातील नामांकित शिक्षण संस्थांनी त्यांच्या संस्था शहरात सुरू केल्या आहेत. पहिलीतील विद्यार्थ्यांकडून एक लाख रुपये फी घेणाऱ्या शाळाही शहरात आहेत. परंतु दुसरीकडे सीबीडी ते दिघापर्यंतच्या झोपडपट्टी परिसरातील गरीब विद्यार्थ्यांना शाळा अर्धवट सोडावी लागत आहे. शहरात एकही रात्रशाळा नाही अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी रात्रशाळा सुरू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये तातडीचा विषय म्हणून हा विषय चर्चेसाठी आणला होता. परंतु हा धोरणात्मक निर्णय असून घाईगडबडीमध्ये तो घेवू नये. याविषयी सविस्तर अभ्यास करण्यात यावा असे मत काही सदस्यांनी व्यक्त केल्यामुळे तो मंजूर करण्यात आला नाही. पुढील सर्वसाधारण सभेमध्ये तो मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)