स्वयंसेवी संघटनांनी केला हत्येचा निषेध
By Admin | Updated: July 24, 2016 04:04 IST2016-07-24T04:04:18+5:302016-07-24T04:04:18+5:30
नेरूळ परिसरातील स्वप्निल सोनवणे याच्या हत्येप्रकरणी शनिवारी निषेध रॅलीचे आयोजन करण्यात होते. नवी मुंबई स्वयंसेवी संघटना, महाराष्ट्र महिला परिषदेच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यात आला.

स्वयंसेवी संघटनांनी केला हत्येचा निषेध
नवी मुंबई : नेरूळ परिसरातील स्वप्निल सोनवणे याच्या हत्येप्रकरणी शनिवारी निषेध रॅलीचे आयोजन करण्यात होते. नवी मुंबई स्वयंसेवी संघटना, महाराष्ट्र महिला परिषदेच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यात आला.
नवी मुंबईतील स्वप्निल सोनवणेची अमानुषपणे हत्या करणारे कुटुंबीय, सूचना देऊनही पीडित मुलाच्या कुटुंबीयांना संरक्षण न देणारे पोलीस तसेच घटना घडत असताना बघ्याची भूमिका घेणाऱ्या नागरिकांचा या ठिकाणी निषेध करण्यात आला. यावेळी परिसरातील प्रवासी, नागरिकांमध्ये शहराच्या सुरक्षिततेबाबात जनजागृती करण्यात आली. नागरिकांनी दक्ष राहावे तसेच जात, धर्म, पंथ, राजकीय पक्ष यांच्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे, अशी ठाम भूमिका ज्येष्ठ समाजसेविका वृषाली मगदूम यांनी मांडली. शेजारी घडणाऱ्या घटनेबाबतीत नागरिकांनी नेहमी सतर्क राहिले पाहिजे.
एखाद्यावर वाईट प्रसंग आल्यास बघ्याची भूमिका न घेता मदतीसाठी धावून गेले पाहिजे, अशी प्रतिक्रिया स्वयंसेवी संघटनेच्या अमरजा चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली. शहर सुरक्षित राहण्यासाठी पोलिसांनीही नागरिकांना योग्य मार्गदर्शन आणि सहकार्य केले पाहिजे, अशी प्रतिक्रिया उपस्थित महिलावर्गाने व्यक्त केली. (प्रतिनिधी)