नवी मुंबई : नवी मुंबईसह पनवेल शहरात गुढीपाडव्याचा जल्लोष साजरा करण्यात आला. मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी सांस्कृतिक, पारंपरिक कार्यक्रमांबरोबर शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले होते. ढोल-ताशा, लेझीमच्या तालावर तरु णांनी नववर्षाचे स्वागत केले. गुढी उभारून ठिकठिकाणी रांगोळी काढून यात्रेचे स्वागत करण्यात आले होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण उत्साहात शोभायात्रेत सहभागी झाले होते. नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने स्वच्छता, प्लॅस्टिकबंदी आणि मतदान करण्याविषयी जनजागृती करण्यात आली.
चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला राज्यात गुढीपाडवा साजरा केला जातो. या निमित्ताने मराठी नववर्षाचे स्वागत ठिकठिकाणी स्वागतयात्रांच्या माध्यमातून केले जाते. पारंपरिक वेशभूषा, चित्ररथ, सामाजिक संदेश, पारंपरिक खेळ आणि प्रात्यक्षिके या शोभायात्रांमधून दाखवली जातात. शहरातील विविध भागांमध्ये अशाप्रकारे शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले होते. मराठी संस्कृती जपण्याचा संकल्प केलेल्या नेरुळमधील संकल्प शोभायात्रा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे सनईच्या मंगल स्वरात व ढोल-ताशांच्या गजरात नेरुळ डी. वाय. पाटील येथील गजानन महाराज मंदिर ते सेक्टर १५ श्री दत्तमंदिरापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या यात्रेमध्ये शहरातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अखिल सानपाडा सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून बाबू गेनू मैदानापासून सानपाडा परिसरात स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सीवूड भागात सीवूड रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन यांच्या माध्यमातून शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
नेरु ळ सेक्टर २ मधील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा संस्थेच्या माध्यमातून सार्वजनिक गुढी उभारून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. स्वच्छतेचा सामाजिक संदेश देत महिलांसाठी हळदीकुंकू आणि खेळ मांडियला या कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. नवी मुंबई प्रेस क्लबच्या वतीने वाशी येथे आयोजित केलेल्या स्वागतयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावर्षी आदिवासी बांधवांसोबत गुढीपाडवा साजरा करण्यात आला. पनवेल, चिरनेर, जव्हार, मोखाडा आदी भागातून आलेल्या आदिवासी बांधवांनी आयोजित स्वागतयात्रेत विविध पारंपरिक नृत्य, खेळ व गाण्यांतून आपल्या संस्कृतीचे नवी मुंबईकरांना दर्शन घडवले. एकात्मतेचे दर्शन घडविणाऱ्या या स्वागतयात्रेची सुरु वात वाशी सेक्टर-१४ येथील गावदेवी मरीआई मंदिरापासून होऊन सांगता वाशीतील शिवाजी चौकात झाली. महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते शिवाजी चौकात गुढी उभारून हिंदू नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या वेळी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रेदेखील उपस्थित होत्या. या कार्यक्र माचे आयोजन नवी मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज जालनावाला यांनी केले होते. या कार्यक्र माच्या निमित्ताने स्वच्छता, मतदान जनजागृती तसेच प्लॅस्टिकबंदीबाबत माहितीपत्रकांचे वाटप करून जनजागृती केली.पनवेलमध्ये विशेष आकर्षणच्चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याच्या दिवशी पनवेलसह खारघर शहरात नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले होते. मराठी फाउंडेशन खारघर तसेच नववर्ष स्वागत समिती, पनवेलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गुढीपाडवा शोभायात्रेत नागरिकांनी पारंपरिक वेशात मोठ्या संख्येने सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.