नवीन सीवूड्स रेल्वे स्थानक सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2016 02:51 IST2016-02-08T02:51:42+5:302016-02-08T02:51:42+5:30

गेल्या आठवड्यात सीवूड्स रेल्वे स्थानकाचा एक मार्ग सुरु करण्यात आला होता. रविवारपासून आता दुसऱ्याही मार्गाला सुरुवात झाली असून वर्षभरापासून सुरु

New Seawoods Railway Station | नवीन सीवूड्स रेल्वे स्थानक सुरू

नवीन सीवूड्स रेल्वे स्थानक सुरू

नवी मुंबई : गेल्या आठवड्यात सीवूड्स रेल्वे स्थानकाचा एक मार्ग सुरु करण्यात आला होता. रविवारपासून आता दुसऱ्याही मार्गाला सुरुवात झाली असून वर्षभरापासून सुरु असलेल्या कामाचा प्रवाशांना होणारा त्रास काहीसा कमी झाल्याने दिलासा दिला आहे. सीवूड्स ते बेलापूर रेल्वेस्थानकादरम्यान असलेल्या मार्गावरील अंधारही आता दूर होणार असून या संपूर्ण मार्गावर दिवे लावण्यात आले आहेत.
अखेर वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर सुरु झालेल्या सीवूड्स रेल्वे स्थानकातील काही किरकोळ कामे अजून बाकी असून, पंखे, दिवे, आसनव्यवस्था, पाणपोईची सोय या ठिकाणी करण्यात आली आहे. या स्थानकाचे अजूनही पूर्णपणे काम झाले नसल्याने सीवूड्स दारावे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडे जाणाऱ्या प्रवाशांना पूर्वीचा रेल्वे रुळ ओलांडून जावे लागत आहे. या नवीन रेल्वेस्थानकामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळत असून या स्थानकाची योग्य देखभाल ठेवली जावी, तसेच प्रवाशांना सर्व सोयी-सुविधा पुरविल्या पाहिजे, असे मत या मार्गावरील प्रवाशांनी व्यक्त केले आहे.

Web Title: New Seawoods Railway Station