नव्या पुलाला शुभारंभापूर्वीच तडे
By Admin | Updated: December 6, 2014 22:32 IST2014-12-06T22:32:29+5:302014-12-06T22:32:29+5:30
घोडबंदरवरुन मुंबईकडे जाणा:या आणि सध्या खुल्या न झालेल्या एमएसआरडीसीच्या उड्डाणपुलावर काही ठिकाणी वाहतूक सुरु होण्यापूर्वीच तडे गेल्याची माहिती समोर आली आहे.

नव्या पुलाला शुभारंभापूर्वीच तडे
ठाणो : घोडबंदरवरुन मुंबईकडे जाणा:या आणि सध्या खुल्या न झालेल्या एमएसआरडीसीच्या उड्डाणपुलावर काही ठिकाणी वाहतूक सुरु होण्यापूर्वीच तडे गेल्याची माहिती समोर आली आहे. ते भरुन काढण्यासाठी आणखी तीन ते चार महिन्यांचा कालावधी जाऊ शकतो अशी माहिती एमएसआरडीसीच्या सुत्रंनी दिल्याने मुंबईकडे जाणा:या वाहन चालकांना आता आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे. तर ठेकेदाराच्या या निकृष्ट कामाबाबात ठाण्याचे रहिवासी असलेले राज्याचे नवनियुक्त सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे कोणती भूमिका घेतात, याकडे टेणींचे लक्ष लागले आह़े
मुंबईकडे जाणा:या 8क्क् मीटरच्या लेनसाठी मुख्यमंत्र्यांना पाचारण करण्यात येणार आहे. परंतु त्यांचा वेळ मिळत नसल्याने या पुलाचा शुभांरभ लाबंला आहे. प्रत्यक्षात यामध्ये काही ठिकाणचे काम शिल्लक असल्याची माहिती एमएसआरडीसीने दिली होती. तसेच वाहतूक पोलिसांनी केलेल्या सुचनांनुसार काही ठिकाणी बदल करण्याचे काम सुरु होते. परंतु पुलाचे काम पूर्ण होऊनही पुलाचा शुभांरभ होत नसल्याने काही दिवसांपूर्वी कळवा - मुंब्य्राचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या पुलाचा शुंभारभ केला होता. त्यानंतर काही वेळ या पुलावरुन वाहतुक सुरु झाली होती. परंतु यामुळेच आता या पुलावर काही ठिकाणी तडे गेल्याची माहिती सुत्रंनी दिली.
विशेष म्हणजे या पुलाच्या बांधणीसाठी तीन ते चार वर्षाचा कालावधी लोटला आहे. असे असतांना पुलाला तडे कसे गेले असा सवाल मात्र या निमित्ताने उपस्थित झाला आहे. परंतु आता तडे गेल्याने या पुलाच्या दुरुस्तीसाठी आणखी तीन ते चार महिन्यांचा कालावधी जाऊ शकतो अशी माहिती एमएसआरडीसीच्या सुत्रंनी दिली आहे. ज्या ठिकाणी गर्डर टाकण्यात आला आहे, त्याच ठिकाणी तडे गेल्याचेही त्यांचे म्हणणो आहे, त्यामुळे तो बदलण्यात येणार असल्यानेच या पुलाचा मुहूर्त आणखी तीन ते चार महिने लांबणीवर पडणार आहे.
या संदर्भात जितेंद्र आव्हाड यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, शुभारंभ केल्यानंतर माझीच गाडी त्यावरुन गेली होती. परंतु त्यानंतर हा पूल बंद केला होता. केवळ एमएसआरडीसी आणि ठेकेदाराच्या चुकीमुळेच हे तडे गेले असून या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही त्यांनी केला. (प्रतिनिधी)
पुलाला कोणत्याही प्रकारचे तडे गेलेले नाहीत. पुलामध्ये हायटेन्शन वायर टाकत असतांना त्याला असलेली प्रिसिव्हिंग केबल मध्येच तुटली आहे. त्यामुळे आता ती पुन्हा नव्याने टाकण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या आहेत.
- किशोर माळी,
एमएसआरडीसी अधिकारी