शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

पनेवल परिसरात महामार्गावर CCTV कॅमे-याचे जाळे; वाहन चालकांवर 'वॉच'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2022 18:45 IST

कळंबोली - गोवा महामार्गावर कॅमेरे बसवण्याच्या कामाला सुरुवात, सप्टेंबर महिन्यात यंत्रणा कार्यान्वित होणार 

अरुणकुमार मेहत्रे

कळंबोली - सायन - पनवेल एक्सप्रेसवर नियमांचे उल्लंघन करुन वाहने चालवणा-या वाहन चालकांना चाप लावण्यासाठी खारघर रेल्वे स्थानक समोरील ओव्हर ब्रिजवर सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तर  कळंबोली - गोवा महामार्गावर चार सीसी टिव्ही कॅमेरे बसवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही यंत्रणा  कार्यान्वित होईल अशी अपेक्षा सिडकोच्या टेलीकॉम विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेला सुध्दा कायदा आणि सुव्यवस्था राखणे तसेच गुन्हेगारीवर आळा घालण्यास सोपस्कार होणार आहे. 

सायन - पनवेल महामार्गावरुन  पुणे तसेच गोवा जाणा-या वाहनांचा संख्या मोठी आहे. अनेकदा वाहन चालकाकडून वेगमर्यादेचे आणि इतर नियमांचे पालन होत नाही.यामुळे हा महामार्ग दिवसेंनदिवस मृत्यूचा सापळा ठरत चालला आहे. त्याचबरोबर अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर सिडकोकडून २०१६ साली सायन पनवेल महामार्गावर दोन्ही लेनवर खारघर रेल्वे स्थानका समोरील ओव्हर ब्रिज येथे  ६ सीसी टिव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणा-या वाहनांवर या यंत्रणेच्या माध्यमातून दंड ठोठावला जातो आहे.

तसेच मुंबई - गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम गेल्या दोन वर्षात पूर्ण झाले आहे. तेव्हा पासून या मार्गावरील वाहतूक जलद झाली आहे. या महामार्गावरुन जेनपीटीसाठी मार्ग जात असल्याने अवजड वाहतूकीची मोठी वर्दळ असते. अनेकदा अपघातही घडतात. त्याचा आढावा घेत कळंबोली ते टी पॉईंट दरम्यान दिशा दर्शक फलकावर दोन्ही लेनवर चार सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. ती लवकरच  पूर्ण होऊन सप्टेंबर  महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. 

अत्याधुनिक कॅमेरा 

खारघर रेल्वे स्थानक समोर महामार्गावरील दोन्ही लेनवर  ६ कॅमेरे आहेत तर  कळंबोली ते टी पॉईंट या महामार्गावरील   दोन्ही लेनवर ४ सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात येत आहेत. अत्याधुनिक स्वरुपाचे त्याचबरोबर अॅव्हरेज स्पीड डिटेक्शन सिस्टीम कॅमेरे महामार्गावर बसवण्यात येत आहेत. ही कॅमेरे विप्रो कंपणीच्या माध्यमातून बसवले जात आहेत. तर बेलापूर सिडको टेलीकॉम येथून त्यावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.  

सिडकोचे  वराती मागून घोडे 

मुंबई - गोवा महामार्गाचे रुंदीकरण होऊन दोन वर्ष उलडून गेली तरी वातूकीला लगाम घालणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले नाही. मात्र मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर शिवसंग्राम पक्षाचे पक्ष प्रमुख विनायक मेटे  त्यांच्या गाडीचा १४ ऑगस्ट रोजी पहाटे पाचच्या  सुमारास अपघात झाल्यानंतर  महामार्गावरील असुरक्षीतता समोर आली आहे. यामुळे महामार्गावरील सुरक्षिततेसाठी सिडकोने आत्ता पाऊल उचलले आहे. वराती मागून घोडे अशीच गत सिडकोकडून करण्यात आल्याचे मत कळंबोली येथील माजी नगरसेवक राजेंद्र शर्मा यांनी व्यक्त केली आहे. 

काम करताना बत्ती गुल 

सीसीटीव्ही कॅमेरे बसवताना महावितरणकडून येणारी विज  जोडणी करण्यासाठी शनिवारी काम हाती घेण्यात आले होते. त्याच बरोबर कॅमेरे नेटवर्कची तपासणी करण्यात येणार आहे. मात्र तास - दोन तास लाईन येत नसल्याने कामाचा खोळंबा होत असल्याचे काम करणा-या कर्मचा-यांनी सांगितले.

टॅग्स :highwayमहामार्ग