खाजगी रु ग्णालयांचा निष्काळजीपणा
By Admin | Updated: March 11, 2016 02:38 IST2016-03-11T02:38:23+5:302016-03-11T02:38:23+5:30
रुग्णालयातून निघणाऱ्या जैविक कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पध्दतीने लावणे ही जबाबदारी त्या रुग्णालयाची आहे, तरी सुध्दा कर्जत शहरातील काही खाजगी रुग्णालयांचा जैविक कचरा कचरापेटीत टाकला जात आहे.

खाजगी रु ग्णालयांचा निष्काळजीपणा
कर्जत : रुग्णालयातून निघणाऱ्या जैविक कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पध्दतीने लावणे ही जबाबदारी त्या रुग्णालयाची आहे, तरी सुध्दा कर्जत शहरातील काही खाजगी रुग्णालयांचा जैविक कचरा कचरापेटीत टाकला जात आहे. हा जैविक कचरा नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी उचलण्यास मनाई केली आहे, त्यांनी तशी तक्र ार नगरपरिषद कार्यालयात दिली आहे. या कामगारांचे आरोग्य यामुळे धोक्यात येणार आहे. त्यामुळे खाजगी रुग्णालयांना नगरपरिषद नोटीस बजावणार आहे.
नागरी घनकचरा अधिनियम २००० व जैविक घनकचरा (व्यवस्थापन व हाताळणी ) नियम १९८८ नुसार रुग्णालयातून निर्माण होणाऱ्या जैविक कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पध्दतीने लावणे ही जबाबदारी त्या रुग्णालयाची आहे, त्यासाठी आवश्यक यंत्रणा उभी करण्याचीही जबाबदारी संबंधित रु ग्णालयाची आहे. कर्जत नगरपरिषद क्षेत्रातील खाजगी रु ग्णालयात निर्माण होणारा कचरा संकलित करून विल्हेवाटीसाठी ठाणे येथे पाठविला जातो, असे असतानाही कर्जतमधील डॉ. घनश्याम नाझीरकर व डॉ. विनय सांगळे यांच्या रुग्णालयातील जैविक कचरा पेटीत टाकला जातो. ही घटना नगरपरिषदेच्या कामगारांनी उघड केली आहे. कर्जत नगरपरिषदेने गावातील कचरा उचलण्याचा ठेका दिला आहे, त्यामुळे सकाळी ठेकेदाराची गाडी त्या त्या ठिकाणी फिरत असते. इमारतीच्या खाली ठेवलेल्या कचरा पेटीमध्ये ठेवलेला कचरा उचलण्याचे काम ते कामगार करीत असतात. यावेळी डॉ. नाझीरकर व डॉ. सांगळे या दोन
रु ग्णालयांच्या आवारातून उचलण्यात येणाऱ्या कचरा पेटीमध्ये वापरलेल्या सिरींज सापडल्या आहेत. त्या कामगारांनी ही बाब नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दादाराव अटकोरे, आरोग्य विभागाचे सुदाम म्हसे आणि स्थानिक नगरसेविका सुवर्णा जोशी यांच्या निदर्शनास आणून दिली. आम्ही हा कचरा उचलणार नाही असे स्पष्ट सांगितले. ही रु ग्णालये हा जैविक कचरा कचरा पेटीमध्ये टाकत असल्याने या कामगारांचे आरोग्य धोक्यात आले तर जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.