शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

अवजड वाहनांच्या पार्र्किं गची डोकेदुखी, वाहतूक पोलिसांचे कारवाईकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 11:22 PM

वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या चालकांवर कारवाई करण्याची मोहीम सध्या पनवेल तसेच नवी मुंबईत तीव्र करण्यात आली आहे.

- वैभव गायकर पनवेल : वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या चालकांवर कारवाई करण्याची मोहीम सध्या पनवेल तसेच नवी मुंबईत तीव्र करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात अनेकांचे परवानेही वाहतूक पोलिसांकडून रद्द करण्यात आले आहे. मात्र महामार्ग तसेच सर्व्हिस रोडवर उभ्या असलेल्या अवजड वाहनांवर कारवाई करण्यास दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे.कळंबोली-मुंब्रा महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग ४ बी, नौपाडा गावाजवळ, तळोजा एमआयडीसी, कळंबोली स्टील मार्केट, मोठा खांदा गाव, तळोजा लिंक रोड, आसूडगाव तसेच पोलीस मुख्यालयाच्या मागील बाजूस सध्याच्या मोठ्या संख्येने अवजड वाहने उभी असतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून रात्रीच्या वेळी अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.पनवेल तालुक्यातून मुंबई-गोवा महामार्ग, जेएनपीटी मार्ग, तसेच कळंबोली परिसरातून जाणाºया एक्स्प्रेसवे या मार्गावर अवजड वाहने सर्रास उभी करण्यात येतात. कळंबोली सर्कल याठिकाणाहून दररोज हजारो वाहनांची ये-जा असते. रात्री तसेच सकाळी ही वाहने नौपाडा, खांदेश्वर स्थानकाजवळ अंतर्गत रस्त्यांवर उभी केली जातात. या वाहनांमध्येच अनेकदा खाद्यपदार्थ बनवले जातात. त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दररोज शेकडोंच्या संख्येने उभ्या असलेल्या या वाहनांवर वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढतच आहे.तळोजा एमआयडीसी व कळंबोली स्टील मार्केटमध्येही अशीच अवस्था पहायला मिळते. याठिकाणच्या सर्व्हिस रोडवर पूर्णपणे अवजड वाहनांनी कब्जा केला आहे. त्यामुळे शहरांतर्गत वाहतूक खोळंबते. सिग्नल तोडला, हेल्मेट नसेल तर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येते, दंड आकारण्यात येतो, मात्र कळंबोली स्टील मार्केट, तळोजा औद्योगिक वसाहत, मुंबई-गोवा महामार्गासह खांदेश्वर येथील जेएनपीटीकडे जाणाºया मार्गावर शेकडोंच्या संख्येने अनधिकृत अवजड वाहने उभी केली जातात. त्यावर कारवाई का होत नाही, असा प्रश्न स्थानिकांकडून विचारण्यात येत आहे.अधिक छाया /पान ४>वाहनांची संख्या वाढली पार्किंग मात्र अपुरेचगेल्या एक दोन वर्षात पनवेल परिसरात होऊ घातलेले आंतरराष्टÑीय विमानतळ, जेएनपीटी बंदर आदी प्रकल्पांमुळे अवजड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेष म्हणजे तळोजा एमआयडीसी, कळंबोली स्टील मार्केट यांच्यामार्फत पार्किंगसाठी आवश्यक भूखंड आरक्षित ठेवले नसल्याने चालकांना अनधिकृतपणे वाहने उभी करावी लागतात.>याठिकाणी होते अवजड वाहनांचे पार्किंगकळंबोली-मुंब्रा महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग ४ बी (नौपाडा गावाजवळ), तळोजा एमआयडीसी, कळंबोली स्टील मार्केट, मोठा खांदा गाव, तळोजा लिंक रोड, आसूडगाव तसेच पोलीस मुख्यालयाच्या मागील बाजूस सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची अनधिकृत पार्किंग केल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे.>पनवेल महापालिका आणणार जप्तीपनवेल महापालिकेने नुकताच बेवारस वाहन जप्ती करण्याचा ठराव महासभेत मंजूर केला आहे. अनेक वर्षे एकाच ठिकाणी धूळखात पडलेल्या व रस्ता अडवलेल्या वाहनांवर महापालिका जप्ती आणणार आहे. अनेक दिवस रस्ता अडवून अनधिकृत पार्किंग केलेल्या वाहनांवर महापालिकेने कारवाई करावी, अशा तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहे.