प्रलंबित समस्या सोडविणे गरजेचे
By Admin | Updated: June 17, 2016 00:52 IST2016-06-17T00:52:43+5:302016-06-17T00:52:43+5:30
पनवेल महानगरपालिकेला विरोध नाही. मात्र सिडकोमार्फत अनेक विषय प्रलंबित आहेत. खारघरसारख्या शहरात ४० टक्क्यांपेक्षा जास्त विकास कामे प्रलंबित आहेत. सिडकोमार्फत फेरीवाला

प्रलंबित समस्या सोडविणे गरजेचे
सात वाहने जप्ते : डी.बी. पथकाची कारवाई
चंद्रपूर : चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने बुधवारी रात्री केलेल्या कारवाईत तीन वाहन चोरांना अटक केली. त्यांच्याकडून सात दुचाकी वाहने हस्तगत करण्यात आली आहेत.
शहर डीबी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. चोरी करून आणलेले एक वाहन भीवापूर परिसरातील आरके चौकात येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यामुळे सुरेश केमेकर आणि संजय आतकुलवार या शिपायांनी सापळा लावला होता. हे पथक वाट बघत असताना संबंधित वाहन एका युवकाने आणले. हे लक्षात येताच पोलिसांनी धर्मेश खोब्रागडे (१९ वर्षे, रा. अष्टभूजा वॉर्ड) याला पकडले. त्याची चौकशी केली असता त्याने दुर्गापूर येथील राजू रामटेके या साथीदाराचे नाव सांगितले. त्यावरून रात्रीच त्यालाही अटक करण्यात आली. हे दोघेही सराईत वाहन चोर असल्याचे पोलिसांच्या चौकशीत पुढे आले आहे. त्यांच्याकडून पुन्हा चार वाहनांच्या चोरीची माहिती मिळाल्याचे सांगण्यात येते. याच कारवाईच्या दुसऱ्या टप्प्यात, सहाय्यक पोलीस निरीक्षक बोंदरे यांनी केलेल्या कारवाईत विठ्ठल मंदीर वॉर्डात राहणाऱ्या विजय चिंचोलकर यालाही अटक करण्यात आली. त्याच्याकडून दोन दुचाकी वाहनांच्या चोरीची माहिती मिळाली. तिघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)