शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नाईकांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2019 01:39 IST

तीन नेत्यांवर जबाबदारी : बैठकीला १३ नगरसेवकांची उपस्थिती; शनिवारी शरद पवारांची भेट घेणार

नवी मुंबई : पक्षाची पडझड रोखून नाईकांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँगे्रसने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नेरूळमध्ये झालेल्या महत्त्वाच्या बैठकीला पक्षाचे १३ नगरसेवक उपस्थित होते. सर्व पदाधिकारी शनिवारी शरद पवार यांची भेट घेणार आहेत.विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री शशिकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली. शहरातील पक्षाची पडझड रोखण्यासाठीची चर्चा या बैठकीमध्ये करण्यात आली.

पक्षांतर करताना सर्व ५२ नगरसेवक व ५ अपक्ष नगरसेवक सोबत असल्याचा दावा नाईक समर्थकांनी केला होता. परंतु प्रत्यक्षात राष्ट्रवादीमध्ये राहू इच्छिणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. सीबीडीमधील तीनही नगरसेवकांनी पक्षासोबत असल्याचे स्पष्ट करून बैठकीला हजेरी लावली. तुर्भे एमआयडीसी परिसरावर वर्चस्व असलेले सुरेश कुलकर्णी यांचे चार नगरसेवक, तुर्भे परिसरातील दोन नगरसेविका, सानपाडामधील १ व कोपरखैरणेमधील शंकर मोरे, सायली शिंदे बैठकीला उपस्थित होते. अजूनही अनेकांनी फोन करून आम्ही सोबत असल्याची ग्वाही दिल्याची माहिती नगरसेवकांनी बैठकीमध्ये दिली. २० ते २५ नगरसेवक पक्षातच राहतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक व पदाधिकारी शनिवारी सायंकाळी मुंबईमध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. या बैठकीमध्ये नवीन जिल्हा अध्यक्ष घोषित करण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पक्षाचे पदाधिकारी, बाजार समितीशी संबंधित घटकांना सोबत घेऊन पक्षाची पडझड रोखण्यावर या वेळी चर्चा झाली.भाजपत गेल्यास नगरसेवकपद धोक्यातच्माजी मंत्री गणेश नाईक यांच्यासोबत पक्षाचे सर्व ५२ नगरसेवक असल्याचा दावा समर्थकांनी केला होता. परंतु नाईक समर्थकांमधील फूट वाढू लागली आहे. नुकत्याच महापौर बंगल्यावर झालेल्या बैठकीत काही नगरसेवक अनुपस्थित होते.च्१३ नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्येच राहण्याचा निर्णय घेतला असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. नाईक समर्थकांनी भाजपत प्रवेश केल्यास पक्षांतरबंदी कायद्याप्रमाणे त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे.नवी मुंबईमधील राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये राहणाºया नगरसेवकांची संख्या वाढत आहे. शुक्रवारच्या बैठकीला १३ पेक्षा जास्त नगरसेवक उपस्थित होते. ही संख्या २५ पर्यंत वाढेल असा विश्वास आहे. शनिवारी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची सर्व जण भेट घेऊन पक्ष बळकटीसाठी वेगाने काम केले जाईल.- अशोक गावडे,नगरसेवक, राष्ट्रवादी काँगे्रस

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईNCPराष्ट्रवादी काँग्रेसGanesh Naikगणेश नाईक