सायनमध्ये राष्ट्रवादीने घेतली प्रचारात मुसंडी
By Admin | Updated: October 11, 2014 03:28 IST2014-10-11T03:28:45+5:302014-10-11T03:28:45+5:30
सायन कोळीवाडा मतदारसंघातून निवडणूक लढणारे राष्ट्रवादीचे उमेदवार प्रसाद लाड यांना प्रत्येक समाज, व्यावसायिक संघटनांकडून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे.

सायनमध्ये राष्ट्रवादीने घेतली प्रचारात मुसंडी
मुंबई : सायन कोळीवाडा मतदारसंघातून निवडणूक लढणारे राष्ट्रवादीचे उमेदवार प्रसाद लाड यांना प्रत्येक समाज, व्यावसायिक संघटनांकडून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. कोणी पत्र देऊन तर कोणी लाड यांच्या प्रचारात सहभागी होऊन आपला पाठिंबा व्यक्त करत आहेत.
लाड हे उद्योजक असून म्हाडाच्या इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती आहेत. पद नसताना त्यांनी केलेले समाजकार्य मोठे आहे. याशिवाय म्हाडाच्या माध्यमातून त्यांनी जे कार्य केले त्यामुळे अधिकाधिक मतदार त्यांच्याकडे आकर्षित होत असल्याची प्रतिक्रिया रहिवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
प्रतीक्षा नगर व्यापारी मंडळ, मांजरेकर व्यापारी मंडई, विश्वशांती बुद्धविहार समिती, जयभीम मित्रमंडळ, पंचशील महिला मंडळ, बुद्धधर्म उत्कर्ष यशोदा महिला मंडळ, विशाखा धम्म जागृती महिला मंडळ, बौद्ध जन पंचायत समिती, दक्षिण भारतीयांचा देवेंद्र समाज, मुदलीयार, कर्नाटक, तेवर, नाडरा, तेलगू समाज, शिखांचा दशमेश दरबार, मुस्लीम समाजातील आक्सा कमिटी, नेहर जबीन कमिटी, उलेमा कौन्सिल, सुलेमान कमिटी, तसेच सायन-कोळीवाड्यातील अनेक छोट्या-मोठ्या मंडळांनी लाड यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
याशिवाय येथील ख्रिश्चन, गुजराती, मारवाडी, कच्छी आणि जैन समाजानेही लाड यांच्यासोबत राहण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे ठिकठिकाणी लाड यांचे जंगी स्वागत होत आहे. (प्रतिनिधी)