शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

महिला आमदारांना मंत्रिपदाची लागली आस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 02:07 IST

उमेदवारी देण्यातही हात आखडता । ठाणे जिल्ह्यात हालचाली; पुरुष आमदारांची रस्सीखेच सुरू

ठाणे : जिल्ह्यातील १८ पैकी केवळ २ महिला आमदार या विधानसभेवर निवडून गेल्या आहेत. एकीकडे मंत्रिमंडळात स्थान मिळविण्यासाठी पुरुष आमदारांची रस्सीखेच सुरू आहे. परंतु, ५० टक्के आरक्षण दिले असतांनाही मंत्रिमंडळात मात्र स्थान मिळत नसल्याने महिलांमध्येही नाराजी आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील आमदार महिलांना आता मंत्रिमंडळात स्थान मिळावे, यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती समोर येत आहे.

ठाणे जिल्ह्यात १८ विधानसभा मतदारसंघ आहेत. पैकी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत केवळ दोनच महिला निवडून आल्या आहेत. शिवसेनेने नऊ तिकिटांपैकी फक्त दीपाली सय्यद यांना उमेदवारी दिली होती. तर काँग्रेस, राष्ट्रवादीने दोन महिला उभ्या केल्या होत्या. जवळजवळ सगळ्याच पक्षांनी महिलांना उमेदवारी देताना हात आखडला होता. भाजपने बेलापूर मतदारसंघातून मंदा म्हात्रे यांनी उमेदवारी दिली होती. मात्र, याच पक्षाने मीरा-भार्इंदर येथे गीता जैन या दमदार उमेदवार असतानाही त्यांना उमेदवारी दिली नव्हती. त्यामुळे त्या अपक्ष लढूनही निवडून आल्या. आता त्या भाजपमध्ये गेल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात १८ पैकी फक्त दोनच महिला आमदार झाल्या आहेत. अशा वेळी या महिलांना मंत्रिमंडळात तरी वाटा मिळायला हवा. परंतु, येथेही त्यांच्यावर अन्याय होणार असल्याचे दिसत आहे. कारण जिल्ह्याला मिळणाऱ्या संभाव्य चारही मंत्रिपदात एकाही महिलेचे नाव घेतले गेलेले दिसत नाही.शिवसेनेचे एकनाथ शिंदे, भाजपचे संजय केळकर, किसन कथोरे आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड (विरोधीपक्ष नेते) हे चार पुरु षचेहरे चर्चेत आहेत. त्यामुळेमहिला आमदार मंत्रिपदाच्या वाटपातही वंचित राहणार असल्याचे दिसत आहे.च्वास्तविक पाहता १८ आमदारांच्या ठाणे जिल्ह्यात सगळ्याच पक्षांनी किमान ६-७ महिलांना उमेदवारी देणे अपेक्षित होते. परंतु, तेवढे सौजन्यही कोणी दाखिवले नाही. परिणामी जिल्ह्यातील २९ लाख १२ हजार ३८२ महिला मतदारांमध्ये नाराजी असल्याचे पाहायला मिळते आहे. तसेच ज्या दोन महिला पुरु षी व्यवस्था धुडकावून निवडून आल्यात, त्यांनाही मानाचे स्थान नसल्याची खंत महिला मतदारांमध्ये आहे.च्गीता जैन यांनी मीरा-भार्इंदर मधून नरेंद्र मेहता भाजपच्या या बड्या असामीला पराभूत केले आहे. तर बेलापूर मतदारसंघातून विजयी झालेल्या मंदा म्हात्रे यांनी २०१४ मध्ये गणेश नाईक यांना पराजित करून त्यांच्या साम्राज्याला धक्का दिला होता. त्यामुळे या दोघ्या वाघीणींचा मंत्रिपदासाठी प्राधान्याने विचार होणे गरजेचे असताना शिवसेना आणि भाजपकडून पुरुष आमदारांचाच मंत्रीपदासाठी विचार केला जात असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.च्२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे. पण त्यांच्या संख्येच्या प्रमाणात कोणत्याच पक्षाने महिलांना निवडणुकीत उमेदवारी देताना मोठे मन दाखिवले नाही. त्यामुळे आता तरी एका तरी महिलेला मंत्रिमंडळात स्थान मिळावे अशी, मागणी महिला पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे.

टॅग्स :Manda Mhatreमंदा म्हात्रेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNavi Mumbaiनवी मुंबई