शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 10:33 IST

कुटुंबाची जबाबदारी पेलण्यासाठी नोकरीनिमित्त मुंबईत आलेल्या तरुणीचा अपेक्षाभंग झाला आणि तिने आत्महत्या करत जीवन संपवले.

नवी मुंबई: कुटुंबाची जबाबदारी पेलण्यासाठी नोकरीनिमित्त मुंबईत आलेल्या तरुणीचा अपेक्षाभंग झाला आणि तिने आत्महत्या करत जीवन संपवले. २२ वर्षीय तरुणीने १२ हजारांच्या पगारात घरभाडे, घरखर्च तसेच आईवडिलांच्या गरजा भागविणे शक्य होत नसल्याची खंत डायरीत लिहून ठेवली आहे. नंदिनी तिवारी असे तिचे नाव असून, ती मूळची कानपूरची आहे. 

कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने नंदिनीने बारावी पूर्ण  केली आणि कुटुंबाचा आधार बनण्यासाठी मुंबईला आली होती. काही महिन्यांपासून ती एका कंपनीत १२ हजारांची नोकरी करत होती. ऐरोली सेक्टर १ येथे इतर तीन मुलींसोबत पेईंग गेस्ट म्हणून ती राहायची. तिच्या तीनही सहकारी गावी गेल्याने काही दिवसांपासून ती एकटीच होती. तिच्या मनमिळावू स्वभावामुळे शेजाऱ्यांसोबत तिची गट्टी जमली होती. शनिवारपासून ती कोणालाही भेटली नसल्याने व घराचा दरवाजा आतून बंद असल्याने शेजाऱ्यांनी रविवारी दुपारी बनावट चावीने घराचा दरवाजा उघडला. यावेळी हॉलमध्ये तिचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला. 

मनातली खंत डायरीत व्यक्त केली घरात पाहणीवेळी तिची डायरी मिळून आली आहे. त्यात मिळणारा पगार व गरजा यांची सांगड जमत नसल्याची खंत  तिने लिहिली असल्याचे महिला सहायक पोलिस निरीक्षक वृषाली पवार यांनी सांगितले. या आर्थिक अडचणीमुळे नैराश्य आल्याने पुन्हा कानपूरला जाणार असल्याचे तिने मैत्रिणीकडे बोलून दाखवले होते. आर्थिक अडचण, अपेक्षाभंग यातून तिने आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. याबाबत तिच्या कुटुंबीयांना कळविले असून ते आल्यानंतर अधिक गोष्टी स्पष्ट होऊ शकतील.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNavi Mumbaiनवी मुंबईMaharashtraमहाराष्ट्र