नवी मुंबई : रस्त्यावर वाहन उभे करून तरुणीसोबत बोलत असताना हटकल्याने वाहतूक पोलिसाला मारहाण करणा-या तरूणाला पोलिसांनी अटक केली आहे.तानाजी पाटील असे मारहाण झालेल्या वाहतूक पोलीस कर्मचाºयाचे नाव असून, ते वाशी वाहतूक शाखेचे कर्मचारी आहेत. सोमवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास सेक्टर १९ येथे रस्त्यावर त्यांना वाहतूककोंडी दिसली. या वेळी दानिश इब्राहिम शेख हा रस्त्यात दुचाकी थांबवून तरुणीसोबत बोलत उभा असल्याचे आढळून आले. यामुळे पाटील यांनी त्याला रस्त्यातून बाजूला थांबून रस्ता खुला करण्याच्या सूचना केल्या. मात्र त्याने तरुणीसोबत बोलत असताना हटकल्याच्या रागात पाटील यांना मारहाण केल्याचे वाशी वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांनी सांगितले.
तरुणीसोबत बोलताना हटकल्याने नवी मुंबईत वाहतूक पोलिसाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 02:03 IST