शहरं
Join us  
Trending Stories
1
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
2
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
3
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
4
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
5
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
6
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
7
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
8
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
9
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
10
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
12
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
13
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
14
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
15
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
16
इस्रायलने प्रक्षेपित केला गुप्तचर उपग्रह, २४ तास शत्रूवर लक्ष ठेवणार
17
टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ
18
आशिया कप स्पर्धेत हार्दिक पांड्याला मोठा डाव साधण्याची संधी; याआधी फक्त तिघांनी गाठलाय हा पल्ला
19
अदानींच्या कंपनीचा शेअर पुन्हा 'दम' दाखवणार? ब्रोकरेजच्या मते ₹645 वर जाणार! तुमच्याकडे आहे का?
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे फासे उलटे पडले; पुतिन यांची तगडी ऑफर, भारत रशियाकडून तेल खरेदी वाढवणार?

कुतुहलापोटी रेल्वे इंजिन बघायला वर चढला, पण हाय पॉवर केबलचा करंट जीवावर बेतला; १६ वर्षीय मुलाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 13:15 IST

Nerul Railway: रेल्वे इंजिन जवळून बघण्याची उत्सुकता असलेल्या एका १६ वर्षांच्या मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.

नेरूळ येथे ६ जुलै रोजी रेल्वेच्या एका दुर्लक्षित इंजिनजवळ घडलेल्या दुर्दैवी घटनेत गंभीर जखमी झालेल्या आरव श्रीवास्तव या शाळकरी मुलाचा १२ जुलै रोजी ऐरोली येथील नॅशनल बर्न्स सेंटरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. सहा दिवस अतिदक्षता विभागात दाखल असलेल्या आरवने शनिवारी अखेरचा श्वास घेतला. ही घटना टाळता आली असती, मात्र रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एका निष्पाप जीवाचा बळी गेला.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, ६ जुलै रोजी आरव श्रीवास्तव आपल्या तीन मित्रांसह, रुझान भंडारी, कनिष्क देबाशिष मुखर्जी आणि मानस विकास पाटील, यांच्यासह नेरूळ परिसरात थांबलेल्या एका कचरा संकलन गाडीला जोडलेल्या रेल्वे इंजिनजवळ गेले. अनेक उत्सुक किशोरवयीन मुलांप्रमाणे, त्यांनाही निष्क्रिय उभ्या असलेल्या या इंजिनजवळ जाण्याची उत्सुकता होती. मात्र, त्यांना डोक्यावरील उच्च-दाबाच्या तारांपासून असलेल्या गंभीर धोक्याची जराही कल्पना नव्हती.

घटनास्थळी कोणतीही कुंपण, धोक्याचे फलक, सूचना फलक किंवा रेल्वे कर्मचारी उपस्थित नव्हते. या मुलांना संभाव्य धोक्याबद्दल सावध करता आले असते. मात्र, तिथे धोक्याची कोणतीही सूचना नव्हती. आरव श्रीवास्तवने केवळ निष्पाप कुतूहलापोटी या थांबलेल्या रेल्वे इंजिनवर चढण्याचा प्रयत्न केला. ही दुर्दैवी घटना तेव्हा घडली जेव्हा उच्च-दाबाच्या तारांमधून विद्युत प्रवाहामुळे 'आर्क फ्लॅश' (Arc Flash) झाला. प्रत्यक्ष स्पर्श झालेला नसतानाही, केवळ जवळ आल्याने हा वीजेचा करंट इतका जोरात लागला की, त्यामुळे आरव गंभीर रित्या भाजला. 

आरवची प्रकृती गंभीर असल्याने त्याला ऐरोली येथील बर्न्स रुग्णालयात (Burns Hospital) हलवण्यात आलं होतं. तिथे तो सहा दिवस मृत्यूशी झुंज देत होता. मात्र, शनिवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, घटनेची सखोल चौकशी सुरू असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं. अधिकाऱ्यांनी आता स्पष्ट केले आहे की, ही घटना केवळ एक अपघात होती आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचे स्टंट किंवा 'रील्स' बनवले जात नव्हते. या प्रकरणात 'मेडिकल लीगल केस' नोंदवण्यात आली असून, तिन्ही मुलांची पुढील चौकशी सुरू आहे.

टॅग्स :Accidentअपघातrailwayरेल्वेNavi Mumbaiनवी मुंबई