Sanjay Naik joins BJP Navi Mumbai: महाराष्ट्रात मुंबई आणि ठाणे महापालिकेएवढीच नवी मुंबई महापालिकाही महत्त्वाची मानली जाते. या क्षेत्रातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि माजी आमदार संदीप नाईक (Sandeep Naik) यांची अखेर घरवापसी झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत संदीप नाईक यांनी भाजप प्रवेश केला. संदीप नाईक यांच्या घरवापसीमुळे गणेश नाईकांची आणि भाजपाची ताकद वाढली असल्याची चर्चा आहे.
संदीप नाईक पुन्हा भाजपावासी
शनिवारी संदीप नाईक यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली होती. संदीप नाईक, संजीव नाईक आणि सागर नाईक यांनी दुपारी एक वाजता मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यामुळ संदीप नाईक हे भाजप प्रवेश करणार अशा तुफान चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर झालेल्या घडामोडींनंतर त्यांचा पक्षप्रवेश निश्चित मानला जात होता. अखेर आज त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
विधानसभेत केलेली बंडखोरी
विधानसभा निवडणुकांच्या वेळी नवी मुंबईच्या बेलापूर मतदारसंघात संदीप नाईक भाजपाकडून लढण्यासाठी आग्रही होते. पण भाजपाने त्या क्षेत्रात आमदार मंदा म्हात्रे यांना तिकीट दिले. त्यामुळे संदीप नाईक यांनी बंडखोरीचा निर्णय घेतला. गणेश नाईक यांची शिष्टाईदेखील त्यांना रोखू शकली नव्हती. त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तिकीट मिळवले होते. पण अखेर मंदा म्हात्रे यांनी संदीप नाईक यांचा पराभव केला होता.
भाजपची ताकद वाढली, पण अंतर्गत धुसफूस
संदीप नाईक यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस (सपा) मध्ये सामील होण्यासाठी पक्ष सोडून गेलेले नवी मुंबई भाजपचे २८ माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपात परतले. त्यामुळे भाजपाला बळ मिळाले आहे. पण पक्षातील काही नेते नाराज असल्याची चर्चा आहे.
Web Summary : Sandeep Naik rejoined BJP in presence of Ravindra Chavan. He had met Devendra Fadnavis. Naik had contested against BJP earlier. 28 ex-corporators also joined, boosting BJP but causing internal discord.
Web Summary : संदीप नाइक रविंद्र चव्हाण की उपस्थिति में भाजपा में शामिल हुए। उन्होंने देवेंद्र फडणवीस से मुलाकात की थी। नाइक ने पहले भाजपा के खिलाफ चुनाव लड़ा था। 28 पूर्व पार्षद भी शामिल हुए, जिससे भाजपा को बढ़ावा मिला लेकिन आंतरिक कलह हुई।