शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

फिफा सामन्यांसाठी नवी मुंबई सज्ज, १३ हजार वाहने उभी करण्याची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 02:15 IST

फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. सुशोभीकरण व प्रसिद्धीसाठीची बहुतांश सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत. नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी ५ आॅक्टोबरला स्मार्ट सिटी वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.

नवी मुंबई : फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. सुशोभीकरण व प्रसिद्धीसाठीची बहुतांश सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत. नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी ५ आॅक्टोबरला स्मार्ट सिटी वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, पालिकेच्या यशवंतराव चव्हाण मैदानावर न्यूझिलंडच्या संघाने दोन तास सराव केला. महापालिकेने तयार केलेल्या मैदानाचेही कौतुक केले.फिफा १७ वर्षांखालील जागतिक फुटबॉल स्पर्धा ६ ते २५ आॅक्टोबर या कालावधीत नवी मुंबईत संपन्न होत आहे. यजमान शहर म्हणून नवी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय व शिक्षण क्रीडा विभागाच्या वतीने महाराष्ट्र फुटबॉल मिशन १ मिलियन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी मनपा आयुक्त रामास्वामी एन. यांच्या अध्यक्षतेखाली गठीत पर्यवेक्षण व सहनियंत्रण समितीची बैठक मंगळवारी मनपा मुख्यालयात घेण्यात आली होती. या बैठकीमध्ये स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठीच्या सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. कायदा व सुव्यवस्था, वाहन व्यवस्थेच्या अनुषंगिक बाबींचा आयुक्तांनी सविस्तर आढावा घेतला. जागतिक स्तरावरील ही फुटबॉल स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात देश-परदेशातून प्रेक्षक उपस्थित राहणार आहेत.सामन्यांदरम्यान वाहतुकीचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी वाहनतळाचे योग्य पद्धतीने नियोजन केले आहे. सीवूडमधील गणपतशेठ तांडेल मैदान, ग्रँड सेंट्रल पार्किंग, शिरवणे एमआयडीसीतील रहेला कंस्ट्रक्शनचा भूखंड, एमआयडीसीमधील भूखंड क्रमांक ८, ८बी, १३ बी, उरण फाटा, खारघरमधील लिटील वंडर मॉल, वंडर्स पार्कमध्ये वाहनतळाची व्यवस्था केली आहे. १३ हजार वाहने उभी करता येतील अशी सोय केली आहे. पार्किंगविषयी सविस्तर नियोजनाची माहिती नागरिकांच्या सुविधेसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.नवी मुंबई शहराची चांगली प्रतिमा निर्माण व्हावी यासाठी आवश्यक प्रयत्न सुरू आहेत. मनपा मुख्यालयातील बैठकीला अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण, रमेश चव्हाण, किरणराज यादव, धनराज गरड, ओवेस मोमीन, तुषार पवार, दादासाहेब चाबुकस्वार, अमरिश पटनिगिरे व इतर अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई