शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

घनकचरा व्यवस्थापनाचा नवी मुंबई पॅटर्न, खतासह आरडीएफची निर्मिती, कचरावाहतुकीला महापालिकेकडून आधुनिकतेची जोड

By नामदेव मोरे | Updated: February 4, 2023 10:27 IST

Navi Mumbai : घनकचरा व्यवस्थापनाचा नवी मुंबई पॅटर्न देशपातळीवर अनुकरणीय ठरू लागला आहे. शहरातून रोज ६५० ते ७०० टन कचरा तयार होतो.

- नामदेव मोरे नवी मुंबई : घनकचरा व्यवस्थापनाचा नवी मुंबई पॅटर्न देशपातळीवर अनुकरणीय ठरू लागला आहे. शहरातून रोज ६५० ते ७०० टन कचरा तयार होतो. यातून रोज ९० टन खत व सरासरी २५० टन आरडीएफची निर्मिती केली जाते. कचरा वाहतुकीलाही आधुनिकतेची जोड दिली आहे. सोसायटीमधील कचराकुंडीला आरएफआयडी, तर वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविली आहे. 

घनकचरा व्यवस्थापन हा प्रत्येक महापालिकांसमोरील गंभीर प्रश्न आहे. शहरात साठलेले कचऱ्याचे ढीग व डंपिंग ग्राउंड परिसरातील दुर्गंधी कमी करण्यात अनेक महापालिका व नगरपालिकांना अपयश आले आहे. हा प्रश्न सोडविण्यात नवी मुंबई महानगरपालिकेला इतरांच्या तुलनेत चांगले यश आले आहे. कोपरखैरणेमधील डंपिंग ग्राउंड बंद करून तेथे उद्यान विकसित केले आहे. तुर्भेमधील पाच सेल बंद केले आहेत. सहावा सेल सुरू असून, दुर्गंधी पसरू न देता कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. शहरातील ६५० ते ७०० टन कचऱ्याचे वर्गीकरण करून तो डंपिंग ग्राउंडवर नेला जातो. 

तेथे भव्य शेडमध्ये ओल्या कचऱ्याचे विंड्रोल तयार केले जातात. प्रत्येक विंड्रोल जवळपास २८ दिवस ठेवला जातो. त्यानंतर मशीनवर चाळणी करून खतनिर्मिती केली जाते. सद्य:स्थितीमध्ये प्रतिदिन जवळपास ९० टन खतनिर्मिती होते. सुक्या कचऱ्यावरही प्रक्रिया केली जाते. कागदी पुठ्ठे, लाकूड, कापड व इतर कचऱ्यावर प्रक्रिया करून रिफ्यूज ड्राइड फ्यूएल अर्थात आरडीएफ तयार केले जात आहे. या आरडीएफचा कारखान्यांमधील बॉयलरमध्ये इंधन म्हणून उपयोग केला जातो.

महानगरपालिकेच्या डंपिंग ग्राउंडवर अत्याधुनिक पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. कचऱ्यातून खतनिर्मिती व आरडीएफची निर्मिती केली जात आहे.     - संजय देसाई, शहर अभियंता

१६,०००  कचराकुंड्यांचे वाटपशहरातील कचरा वाहतुकीमध्येही आधुनिक यंत्रणेचा उपयोग केला जात आहे. गृहनिर्माण सोसायट्यांना महानगरपालिकेने जवळपास १६ हजार कचराकुंड्या दिल्या आहेत. ओला, सुका व घातक कचऱ्यांसाठी स्वतंत्र डबे पुरविण्यात येत आहेत. प्रत्येक डब्याला रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटीफिकेशन डिव्हाइस (आरएफआयडी) बसविण्यात आला आहे. यामुळे डबे कधी उचलले याची माहिती प्रशासनास मिळते. वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविली आहे. 

 कचरा संकलन व वाहतुकीला आधुनिकतेची जोड देण्यात आली आहे. सोसायटीमधील कचऱ्याच्या डब्यांमध्ये आरएफआयडीचा वापर केला जात आहे. कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली. - डॉ. बाबासाहेब राजळे,    उपायुक्त, घनकचरा

प्लास्टिकवरही प्रक्रिया     डंपिंग ग्राउंडवर कचरा वेचक महिलांच्या माध्यमातून प्लास्टिक कचरा वेचला जातो. प्लास्टिकवरही प्रक्रिया केली जात आहे.    प्लास्टिक तुकड्यांचे गोळे तयार करून त्यांचा रस्ते बनविण्यासाठी व इतर वस्तू बनविण्यासाठी उपयोग केला जातो.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई