शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
2
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
3
डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
4
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
5
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
6
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
7
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
8
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
9
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
10
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
11
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
12
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
13
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
15
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
16
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
17
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
18
Tulsi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
19
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
20
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास

नवी मुंबई महापालिकेचा ऐतिहासिक निर्णय, स्मशानभूमीत पर्यावरणपूरक  ‘ब्रिकेट’ वापरणार

By नारायण जाधव | Updated: February 22, 2024 12:36 IST

महापालिकेच्या या निर्णयाचे सर्व थरातून जोरदार  स्वागत होत आहे. नॅटकनेक्ट फाऊंडेशनचे बी एन कुमार यांनी या संकल्पनेचे स्वागत करून पंतप्रधानांना ही कल्पना राष्ट्रीय स्तरावर नेण्याची विनंती केली आहे

नवी मुंबई : शहर स्वच्छता, पर्यावरण संवर्धनात अग्रेसर असलेल्या नवी मुंबई महापालिकेने अंत्यसंस्कार पर्यावरणपूरक व्हावेत यासाठी येणारी प्रेते जाळण्यासाठी ब्रिकेटचा अवलंब करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. झाडे आणि उसाच्या चिपाडापासून बनवलेल्या ब्रिकेटमुळे नवी मुंबईतील महागडे सरपण वाचवण्यास मदत होईल, असे अतिरिक्त महापालिका आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी सांगितले. 

महापालिकेच्या या निर्णयाचे सर्व थरातून जोरदार  स्वागत होत आहे. नॅटकनेक्ट फाऊंडेशनचे बी एन कुमार यांनी या संकल्पनेचे स्वागत करून पंतप्रधानांना ही कल्पना राष्ट्रीय स्तरावर नेण्याची विनंती केली आहे. हे राष्ट्रीय राजधानीत मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषणास कारणीभूत असलेल्या पेंढ्या जाळण्याच्या समस्येचे निराकरण करू शकते, असे  कुमार म्हणाले.  “केंद्राने उत्तरेकडील राज्यांना हा प्रकल्प तपासण्यास सांगावे कारण शेतातील कचऱ्याचा वापर करून ब्रिकेट बनवता येतात,” असे कुमार यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, मनपाने तुर्भे घनकचरा व्यवस्थापन सुविधेवर किंवा बेलापूर येथे आणि फक्त दोन कोटी रुपये खर्चून स्वतःचे ब्रिकेट प्लांट उभारण्याच्या विचारात आहे. मनपाने तुर्भे स्मशानभूमीत  ब्रिकेटसह एक पथदर्शी प्रकल्प सुरू करणार आहे. यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व स्मशानभूमीत पर्यावरणपूरक साहित्याचा वापर केला जाईल.

राज्यातील ऊस क्षेत्रामध्ये मुबलक प्रमाणात ते उपलब्ध आहे आणि शहरातील वृक्षतोड आणि छाटणीमध्ये भरपूर कचरा निर्माण होतो. यामुळे एकाच झटक्यात दोन समस्या - स्मशानभूमीत सरपण निर्माण करणारा धूर आणि कचरा विल्हेवाट - सुटतील असे कुमार म्हणाले 

काही कुटुंबांना इलेक्ट्रिक किंवा सीएनजीवर चालणारी स्मशानभूमी वापरण्यास काही कारणांमुळे संकोच करतात, त्यांचे ब्रिकेट निराकरण करतील, असा महापालिकेस विश्वास आहे.