शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कचरामुक्त शहरांत नवी मुंबई महापालिका राज्यात अव्वल; आयुक्तांनी केले नागरिकांचे अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 06:33 IST

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ३ वेळा वेगवेगळ्या केंद्रीय स्वच्छता निरीक्षक पथकांकडून स्टार रेटिंगच्या निकषान्वये सर्वेक्षण केले होते. यामध्ये केंद्र सरकारमार्फत नियुक्त त्रयस्थ संस्थेच्या निरीक्षक पथकांनी कागदपत्रांची पाहणी केली होती.

नवी मुंबई : 'स्वच्छ भारत मिशन' अंतर्गत देशातील कचरामुक्त शहरांना देण्यात येणाºया स्टार रेटिंगची घोषणा केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने हरदीपसिंह पुरी यांनी केली. यात नवी मुंबईला पुन्हा एकदा फाइव्ह स्टार रेटिंग जाहीर झाले आहे. देशातील ६ शहरांना कचरामुक्त शहराचे पंचतारांकित रेटिंग जाहीर झाले असून त्यामध्ये नवी मुंबई हे महाराष्ट्र राज्यातील एकमेव शहर आहे. मानांकनाबद्दल महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी नवी मुंबईकरांचे अभिनंदन केले आहे.स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ३ वेळा वेगवेगळ्या केंद्रीय स्वच्छता निरीक्षक पथकांकडून स्टार रेटिंगच्या निकषान्वये सर्वेक्षण केले होते. यामध्ये केंद्र सरकारमार्फत नियुक्त त्रयस्थ संस्थेच्या निरीक्षक पथकांनी कागदपत्रांची पाहणी केली होती. कोणतीही पूर्वसूचना न देता विविध ठिकाणांना भेटी देत तेथील नागरिकांशी संवाद साधून त्यांचे प्रत्यक्ष अभिप्रायही केंद्रीय पथकांकडून जाणून घेण्यात आले होते. अशा सर्वंकष पाहणीच्या आधारे गुणांकन करण्यात येऊन कचरामुक्त शहराचे स्टार रेटिंग जाहीर करण्यात आले आहे.नवी मुंबईसह मध्य प्रदेशमधील इंदूर, कर्नाटकमधील मैसूर, गुजरातमधील सुरत व राजकोट आणि छत्तीसगढमधील अंबिकापूर ही देशातील शहरे पंचतारांकित रेटिंगची मानकरी ठरली आहेत. स्वच्छ सर्वेक्षण २०१९मध्ये स्वच्छ शहरात राज्यात सर्वप्रथम व देशात सातव्या क्रमांकाच्या शहराचे मानांकन महापालिकेस प्राप्त झाले होते. शहराच्या फाइव्ह स्टार रेटिंगबद्दल समाधान व्यक्त करीत पालिका आयुक्त मिसाळ यांनी प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकासह सर्वांचे अभिनंदन केले.नवी मुंबई शहर स्वच्छ व आरोग्यसंपन्न ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी घरातच थांबून व सोशल डिस्टन्सिंग राखून आपले योगदान द्यावे. यापुढील काळात पंचतारांकित रेटिंगच्या पुढे जात आपली सेव्हन स्टार रेटिंग प्राप्त करण्यासाठी वाटचाल राहील.अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई