शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सगळ्या मुस्लिमांविरोधात नाही, पण जो..."; मंत्री नितेश राणेंनी दिली उघड धमकी
2
काळजाचा थरार! ११ वर्षीय शिवमनं बिबट्याच्या हल्ल्यातून ९ वर्षीय बहीण स्वरांजलीला वाचवले
3
वेदा‍ंता ग्रुपचे चेअरमन अनिल अग्रवाल यांचा मुलगा अग्निवेश अग्रवाल यांचं निधन
4
अमेरिका-रशियात तणाव वाढला! व्हेनेझुएलाहून जाणारा रशियन तेल टँकर US नौदलाने जप्त केला
5
उल्हासनगरातील गुंडाराज संपवून शहराचा चेहरामोहरा बदलणार; CM देवेंद्र फडणवीसांचा निशाणा कुणावर?
6
मतदानापूर्वीच मनसेत मोठा भूकंप होणार?; भाजपा-शिंदेसेना राज ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत
7
मासेमारी करताना समुद्रात पडला खलाशी; ४ दिवसांनी मध्यरात्री 'असं' काय घडलं, कुटुंबाला बसला शॉक
8
पुण्यात 'पाताळ लोक' तयार करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला अख्खा प्लॅन
9
"भाजपा कधीच मुस्लीम विरोधी नाही"; अकोटमधील AIMIM सोबत युतीवर BJP आमदाराचा पुन्हा ट्विस्ट
10
Maharashtra Government: सर्व पक्षांच्या प्रतोदांची पॉवर वाढली! आता थेट मंत्रिपदाचा दर्जा; अलिशान सुविधाही मिळणार
11
रक्षकच बनला भक्षक! चालत्या गाडीत पोलिस निरीक्षकाचा 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार
12
Nashik Accident: नाशिक-पेठ महामार्गावर काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; ४ जण ठार, ६ गंभीर जखमी
13
Shirdi Crime: 'तुझा नवरा माजलाय, त्याचे हातपाय तोडावे लागतील', अपहरण, हत्या आणि टायर टाकून जाळले; शिर्डीतील घटना
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात चकमक; सुरक्षा दलांनी घनदाट जंगलात दहशतवाद्यांना घेरले
15
AIMIM सोबत युती भोवणार, भाजपा आमदाराला पक्षाची नोटीस; "पक्षाच्या ध्येय धोरणाला सुरंग लावला..."
16
Plastic Water Bottle: गाडीत ठेवलेल्या बाटलीतील पाणी पिता का? तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा!
17
'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तान बिथरला; युद्ध रोखण्यासाठी ६० वेळा अमेरिकेला विनवणी, मग ४५ कोटी...
18
"अजित पवार हेच महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे 'आका', स्वतःच्या लेकाचे पराक्रम पहा"; भाजपा आमदार लांडगेंचा हल्ला, पार्थ पवारांवरून डिवचले
19
किंग कोहलीभोवती चाहत्यांचा गराडा; 'विराट' गर्दीतून कसा बसा कारपर्यंत पोहोचला! व्हिडिओ व्हायरल
20
बापाचे काबाडकष्ट! १५ वर्षे दोन नोकऱ्या करून लेकीला दिलं शिक्षण; सर्वत्र होतंय भरभरून कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

नगरविकासचे आदेश डावलून वाट्टेल ती कामे घेण्याचे धोरण; कार्यकर्त्यांसाठी आर्थिक शिस्त मोडली 

By नारायण जाधव | Updated: January 5, 2026 10:08 IST

निवडणुकीत मुद्दा ऐरणीवर

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : केंद्र आणि राज्य शासनाकडून निधी मिळतो किंवा पुरेसा निधी उपलब्ध आहे म्हणून वाट्टेल ती कामे घेण्याचे महापालिका आणि नगरपालिकांच्या धोरणाला लगाम घालण्यासाठी नगरविकास विभागाने केवळ अत्यावश्यक असणारी कामेच हाती घेण्याचे आदेश दिले. मात्र, या आदेशाला केराची टोपली दाखवली जात असल्याचे उघड झाले आहे.

केवळ समर्थक नगरसेवकांच्या प्रभागात  त्या-त्या ठिकाणच्या प्रशासनाने नको ती कामे काढून कोट्यवधींची उधळपट्टी केली आहे.  सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली ही कामे हाती घेतली. नगरविकास विभागाने काढलेल्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी कोणत्या कामांना प्राधान्य द्यावे, याचा अग्रक्रमच ठरवून दिला होता. यानुसार पाणीपुरवठा, मलनिस्सारण योजना, घनकचरा व्यवस्थापन सुस्थितीत झाल्यानंतरच नगरविकासची परवानगी घेऊनच रस्ते, प्रशासकीय इमारती, क्रीडांगणांचा विकास, नाट्यगृह, पथदिवे आदी कामे करावीत, असे बजाविले होते. 

या शहरांत आदेश धाब्यावर

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, छ. संभाजीनगर, कोल्हापूर अशा शहरात नगरविकासच्या परवानगीविनाच रस्ते, पथदिवे, क्रीडांगणे, इमारतीच्या विकासावर कोट्यवधींच्या खर्चाची कामे सुरू केली आहेत. मुंबई, ठाण्यात कामांबाबत उद्धवसेना, तर नवी मुंबईत भाजपने व पनवेलमध्ये शेकापने प्रशासनावर गरज नसताना नको ती कामे काढल्याने टीका केली आहे. 

का काढले होते आदेश : सद्य:स्थितीत २१७ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रोज १३५ लिटरप्रमाणे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.  नांदेड, जळगाव,  धुळेसारख्या अनेक शहरांत दररोज पाणी मिळत नाही, तर १०२ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मलनिस्सारण प्रकल्प कार्यान्वित आहेत. ही तफावत दूर करण्यासाठी उर्वरित शहरांत पाणीपुरवठा करून मलनिस्सारण प्रकल्पांची कामे अमृत २ अंतर्गत हाती घेण्याचे  निर्देश होते. याशिवाय नगरोत्थान महाभियान, जागतिक बँकेच्या प्रस्तावित महाराष्ट्र नागरी पाणीपुरवठा पुनर्वापर कार्यक्रम पुढील पाच वर्षांत पूर्ण करण्यास सांगितले होते.

असा ठरविला होता कामांचा प्राधान्य क्रम

१. पाणीपुरवठा योजना२. मलनिस्सारण अनुषंगिक कामे३. घनकचरा व्यवस्थापनाचे भांडवली प्रकल्प / सार्वजनिक शौचालये४. रस्ते५. प्रशासकीय इमारत, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्यान / हरितपट्टे, जलस्त्रोतांचे संवर्धनासह पुनर्ज्जीवन, क्रीडांगणे, पथदिवे, स्मशानभूमी, अग्निशमन केंद्र, शाळा व दवाखान्यांच्या इमारती, भौतिक सुविधा, आठवडी बाजार, व्यापारी संकुल, बहुपयोगी सभागृह, नाट्यगृह व इतर कामे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Ignoring urban development orders, arbitrary works undertaken; financial indiscipline for workers.

Web Summary : Ignoring urban development orders, municipal corporations are splurging on unnecessary projects, prioritizing supporter's wards. Water supply, sewerage, and waste management should take precedence, but rules are flouted in cities like Mumbai and Pune, raising concerns about financial discipline.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Navi Mumbai Municipal Corporation Electionनवी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाNavi Mumbaiनवी मुंबई