नवी मुंबईतील म्हापे एमआयडीसीमधील एका कंपनीत काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकाच्या बुटात भलामोठा कोब्रा आढळल्याने परिसरात एकच खळबळ माजली. पाऊस पडत असल्याने सुरक्षारक्षकाने त्याचे बूमट केबिनच्या बाहेर काढले. परंतु, त्याने पुन्हा बूट घालण्याचा प्रयत्न केला असता एका बुटात त्याला हालचाल जाणवली. त्यामुळे त्याने बुटात पाहिले असता त्यात एक साप दिसला. त्यानंतर त्यांनी ताबडतोब सर्पमित्राला फोन करून बोलावून घेतले. सर्पमित्राने सापाला पकडून जंगलात सोडले. सुदैवाने, सापाने सुरक्षा रक्षकाला कुठलीही इजा केली नाही. सर्पमित्राने हा साप किंग कोब्रा असल्याचे सांगितले, ज्याची गणना जगातील अत्यंत विषारी सापामध्ये केली जाते.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, म्हापे एमआयडीसीमधील एका कंपनीतील एका सुरक्षा रक्षकाने पावसामुळे त्याचे बूट केबिन बाहेर काढले. पंरतु, थोड्यावेळाने सुरक्षा रक्षकाने बुट घालण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याला बुटामध्ये असामान्य हालचाल जाणवली. त्यामुळे त्याने बुट तपासले असता त्यात साप दिसला. यानंतर सुरक्षा रक्षकाने ताबडतोब सर्पमित्र अक्षय डांगे यांना घटनास्थळी बोलावून घेतले . अक्षय यांनी सापाला पकडून जंगलात सोडून दिले.
किंग कोब्रा ही जगातील सर्वात विषारी सापांची प्रजाती आहे. किंग कोब्रा मुख्यतः भारत, दक्षिण-आशिया, दक्षिण-पूर्व आशिया आणि फिलिपाइन्स या भागात आढळतो. किंग कोब्रा ही अत्यंत सतर्क आणि बुद्धिमान सापाची जात मानली जाते. तज्ज्ञांच्या मते, किंग कोब्रा एका दंशात इतके विष सोडतो की, त्यात एकाच वेळी २० हत्तींना मारण्याइतकी ताकद असते. किंग कोब्राला सापांच्या जगातील राजा मानला जातो. किंग कोब्रा हा सापाला खाणारा साप असल्यामुळेच त्याला हे नाव मिळाले आहे.