शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुद्धाचे संकेत? 'या' २१ देशात प्रवास करू नका; अमेरिकन नागरिकांसाठी Travel Advisory जारी
2
बंडखोरांसह ३२ जणांचं ६ वर्षासाठी निलंबन; छुपा प्रचार करणाऱ्यांची गय करणार नाही, भाजपाचा इशारा
3
द बर्निंग ट्रेन! मुंबईत लोकलला भीषण आग; ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
4
"माझं खरं नाव आशिष नाही तर अब्दुल..."; लव्ह जिहादवरून नितेश राणेंचा पुन्हा प्रहार
5
नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी भाजपाच्या ५ आमदारांचा 'लेटर बॉम्ब'; गुजरातमध्ये उडाली खळबळ
6
"मागच्या जन्मी पाप करणारा नगरसेवक-महापौर होतो" मुख्यमंत्री गंमतीने असं का म्हणाले?
7
पाकिस्तानात खळबळ! पंतप्रधान शहबाज शरीफ यांना अटक होणार?; जारी झाला अरेस्ट वॉरंट
8
EXCLUSIVE: अजित पवार-शरद पवार दोघेही एकत्र भाजपसोबत आले तर काय...? CM फडणवीसांनी दिलं उत्तर
9
भारत-न्यूझीलंड T-20 सीरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; तिलक वर्मा संघाबाहेर...
10
२३४ पैकी ५६ जागा अन् ३ मंत्रिपदाची मागणी, शाहांनी आखली रणनीती; तामिळनाडूत भाजपाचं गणित काय?
11
ठाकरे माझे मतदार! मत मागण्यासाठी मातोश्रीवर पोहोचला शिंदेसेनेचा उमेदवार, सारेच अवाक्, त्यानंतर घडलं असं काही? 
12
दुसऱ्याची चूक आणि करोडपती झाला ट्रेडर, ४० कोटी आले खात्यात, पण प्रकरण गेलं कोर्टात, अखेरीस...
13
"त्याच रात्री मी फडणवीसांना म्हणालो, असे असेल तर मी राजकारणातून बाहेर पडतो", गणेश नाईकांनी सांगितलं प्रकरण काय?
14
एक लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असता; अमेरिकेत दोन भारतीयांनी केला 'हा' मोठा गुन्हा
15
EXCLUSIVE: "१६ तारखेनंतर आम्ही पुन्हा एकत्र चहा घेऊ..."; राज ठाकरेंबद्दल नेमकं काय म्हणाले CM फडणवीस?
16
"डोनाल्ड ट्रम्प हिटलर बनलेत, संपूर्ण जगावर नियंत्रण मिळवायचंय, एक ना एक दिवस आपल्यालाही..."
17
Realme चा धमाका! २००MP कॅमेरा, AI ची कमाल, दमदार फीचर्ससह पॉवरफुल स्मार्टफोन लाँच
18
काका-पुतणे एकत्र येणार? अजित पवार स्पष्टच म्हणाले, "यावरून काय ओळखायचं ते ओळखा"
19
२९ किलो सोनं, रोख रक्कम, DRI ने रॅकेटचा कार्यक्रम केला; कुठे झाली कारवाई, छाप्यात किती कोटी मिळाले?
20
Vijay Hazare Trophy Quarter Finals Full Schedule : मुंबईसह हे ८ संघ क्वार्टर फायनलमध्ये; इथं पाहा संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

'दहा वर्षे कुठे होतात?', मतदारांच्या प्रश्नाने बहुतांश उमेदवार अनुत्तरीत

By कमलाकर कांबळे | Updated: January 5, 2026 09:58 IST

गतनिवडणुकीत निवडून आल्यानंतर अनेक उमेदवारांनी प्रभागासह मतदारांकडे पाठ फिरवली होती. स्थानिक प्रश्न, नागरिकांशी संवाद हे दहा वर्षांत दुय्यम ठरले.

- कमलाकर कांबळे

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : अर्ज माघारीनंतर रिंगणात असलेल्या ४९९ उमेदवारांनी आपल्या प्रचारास जोमाने सुरुवात केली आहे. यात प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात अनेकांना मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागल्याचे दिसून आले. आतापर्यंत पाणीटंचाई, अनधिकृत फेरीवाले, सार्वजनिक वाहतुकीचे वाजलेले तीनतेरा यामुळे त्रस्त झालेल्या मतदारांनी मते मागायला येणाऱ्या उमेदवारांसह त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रश्न विचारून भंडावून सोडल्याची चित्र पाहायला मिळत आहे.

गतनिवडणुकीत निवडून आल्यानंतर अनेक उमेदवारांनी प्रभागासह मतदारांकडे पाठ फिरवली होती. स्थानिक प्रश्न, नागरिकांशी संवाद हे दहा वर्षांत दुय्यम ठरले. या काळात माजी नगरसेवकांचे पालिकेशी संबंध हे बहुतांशी कंत्राटे, शिफारशीपुरतेच मर्यादित राहिल्याचे दिसले.

प्रस्थापित पुन्हा सक्रियआता निवडणुकीची चाहूल लागताच वर्षभरापासून हेच प्रस्थापित पुन्हा सक्रिय झाले होते. दहा वर्षात मतदारांशी फटकून वागणारे अनेक चेहरे आता मत मागताना अचानक अदबीने, प्रेमाने आणि आपुलकीने संवाद साधताना दिसत आहेत. हात जोडणे, आठवणी काढणे, विकासाची आश्वासने देणे, हे सारे दृश्य मतदारांनी याआधीही पाहिलेले आहे.

दहा वर्षांत अनधिकृत बांधकामांचा स्फोटदहा वर्षांच्या प्रशासकीय काळात शहरात अनधिकृत बांधकामांचा वेग प्रचंड वाढला. प्रभागनिहाय पाहणी केली असता निवासी, व्यावसायिक तसेच मिश्र वापराच्या इमारती नियम धाब्यावर बसवून उभ्या राहिल्याचे चित्र आहे. त्याचप्रमाणे याच काळात बेकायदा झोपड्यांचाही पसारा वाढला. याच झोपड्या अनेक प्रस्थापितांची व्हॉटबँक ठरली आहे. फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढले आहे.

महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून शहराच्या विविध भागांत बांधलेल्या बहुउद्देशीय वास्तू वापराविना धूळखात पडून आहेत. सध्या निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या माजी नगरसेवकांनी या सर्व मुद्यांना सोयिस्कररीत्या बगल दिली. तरुण आणि सुजाण मतदारांना हा प्रश्नसुद्धा सतावताना दिसत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Voters Grill Candidates: 'Where Were You for Ten Years?'

Web Summary : नवी Mumbai voters confront candidates about neglecting local issues like water scarcity and unauthorized construction during their tenures. Many ex-corporators face tough questions regarding their past absence and unfulfilled promises, revealing voter frustration.
टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporation Electionनवी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६